janaushadi
janaushadi  
देश

जनौषधी केंद्र शोधण्यासाठी 3,25,000 पेक्षा जास्त लोकांकडून “जनौषधी सुगम” मोबाइल ॲपचा वापर

Dainik Gomantak

नवी दिल्ली, 

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील टाळेबंदीमध्ये आपल्या जवळपासची प्रधानमंत्री जनौषधी केंद्र (पीएमजेएके) शोधून त्यात परवडणाऱ्या जेनेरिक औषधांची उपलब्धता आणि त्यांच्या किंमती जाणून घेण्यासाठी "जनौषधी सुगम” मोबाइल ॲप लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत करीत आहे.

त्याद्वारे मिळणाऱ्या अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 3,25,000 पेक्षा जास्त लोक जनौषधी सुगम मोबाइल अॅप वापरत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषध विभागांतर्गत भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्र उपक्रम असलेल्या ब्युरो ऑफ फार्मा (बीपीपीआय) द्वारा प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेसाठी हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. जवळपासची जनौषधी केंद्रे शोधणे, ते शोधण्यासाठी गुगल मॅपचा उपयोग करणे, जनौषधी जेनेरिक औषधे शोधणे, जेनेरिक आणि इतर नामांकित औषधांच्या किमतीमधील तफावत तसेच त्या अनुषंगाने होणारी बचत याबाबत विश्लेषण करणे इत्यादी सुविधा या ॲपद्वारे प्रदान करण्यात आल्या आहेत.

जनौषधी सुगम मोबाइल ॲप हे अँड्रॉइड आणि आय-फोन या दोन्हीवर उपलब्ध आहे. हे गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरून वापरकर्त्याद्वारे विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: लोकसभेत शत प्रतिशत मतदान करण्याचे लक्ष्य

Panaji News : काँग्रेसकडून फक्त मतपेटीचे राजकारण : माविन गुदिन्हो

Bardez ODP Stay: बार्देशमधील पाच ‘ओडीपीं’ना स्‍थगिती; खंडपीठाचा आदेश

Loksabha Election : विकसित भारतासाठी मतदान करा! मुख्यमंत्री सावंत

Goa CM On Congress: तीन पिढ्या ‘पीएम’पद लाभूनही सामान्यांसाठी काय केले? प्रमोद सावंत यांचा सवाल

SCROLL FOR NEXT