Vaccination Dainik Gomantak
देश

मोदी सरकारचा मोठा निर्णय, Monkeypox च्या लसीबाबत टेंडर जारी

Monkeypox Vaccine: केंद्र सरकारने मंकीपॉक्सची लस तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Monkeypox Cases In India: केंद्र सरकारने मंकीपॉक्सची लस तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे चार रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी तीन रुग्ण केरळमध्ये आढळून आले असून एका रुग्णाची दिल्लीत पुष्टी झाली आहे. दुसरीकडे, लसीबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) चे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी सांगितले की, 'आम्ही लसीबाबत डॅनिश कंपनी बव्हेरियन नॉर्डिकशी बोलणी करत आहोत.'

दरम्यान, पूनावाला म्हणाले होते की, 'करार झाल्यास वॅक्सीन देशात आयात करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतील.' ते पुढे म्हणाले की, ''देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्सचे केवळ चार रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे स्थानिक पातळीवर लसीची मागणी आणि विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी SII ला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.''

या देशांमध्ये संसर्गाचा प्रसार

युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, कॅनरी बेटे, इस्रायल आणि स्वित्झर्लंडसह काही स्थानिक नसलेल्या देशांमध्ये मंकीपॉक्स संसर्गाची नोंद झाली आहे. ICMR ने या देशांना भारतात येणाऱ्या लोकांवर बारीक नजर ठेवण्याचे तसेच लोकांच्या संपर्कात येऊ नये असे आवाहन केले आहे. त्याच वेळी, भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील आरोग्य संस्थांना उद्रेकावर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT