Prisoners  Dainik Gomantak
देश

मोदी सरकारचा मोठा निर्णय, 60 वर्षांवरील कैद्यांची 15 ऑगस्टला होणार सुटका

ज्या गरीब कैद्यांनी आपली शिक्षा पूर्ण केली, त्यांनाही दंडातून सूट देण्यात येणार

दैनिक गोमन्तक

Prisoners Release: 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत, भारत सरकार महिला आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ट्रान्सजेंडर दोषींची शिक्षा कमी करण्याचा विचार करत आहे. मात्र ज्यांचे वर्तन चांगले आहे त्यांना सरकारचा हा आशीर्वाद मिळणार आहे. 60 वर्षांवरील पुरुष कैदी आणि अर्ध्यापक्षा जास्त शिक्षा पूर्ण केलेल्या अपंग कैद्यांनाही सरकार या योजनेचा लाभ देणार आहे.

त्या कैदांन्या ही योजना लागू होणार नाही

ज्या गरीब यांनी आपली शिक्षा पूर्ण केली आहे परंतु निधीअभावी दंड न भरल्याने अद्याप कारागृहात आहेत, त्यांनाही दंडातून सूट देण्यात येणार आहे. ज्या कैद्यांना मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली आहे किंवा ज्यांच्यावर बलात्कार, दहशतवाद, हुंडाबळी आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत त्यांना ही योजना लागू होणार नाही, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी

2020 च्या अधिकृत अंदाजानुसार, भारतातील तुरुंगांची क्षमता जास्त आहे. देशातील कारागृहांमध्ये 4.03 लाख कैदी ठेवण्याची क्षमता आहे, तर सध्या कारागृहांमध्ये सुमारे 4.78 लाख कैदी असून त्यापैकी सुमारे एक लाख महिला आहेत. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे की या पात्रता निकषांची पूर्तता करणार्‍या कैद्यांची 15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी तीन टप्प्यांत सुटका केली जाईल.

ज्यांचे चांगले वर्तन त्यांना मिळणार योजनेचा लाभ

मंत्रालयाने म्हटले आहे की 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला आणि ट्रान्सजेंडर कैदी, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष कैदी, 70 टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त या योजनेअंतर्गत सोडण्यात येईल. जर त्यांनी अर्धी शिक्षा भोगली असेल आणि त्यांची वागणूक चांगली असेल तरच त्यांची सुटका होणार हेही तेवढेच महत्वाचे आहे. वरिष्ठ नागरी आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या राज्यस्तरीय चौकशी समितीने सखोल तपास केल्यानंतर कैद्यांच्या सुटकेचा विचार करावा, असे अहवालात म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की ज्या व्यक्तींनी त्यांची अर्धी शिक्षा भोगली आहे, ज्यांनी 18 वर्षे ते 21 वर्षे वयोगटातील गुन्हा केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हेगारी खटला नाही, त्यांनाही विशेष सूट विचारात घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT