MIG-21 Plane Crash Dainik Gomantak
देश

Video: राजस्थानच्या बारमेरमध्ये MIG-21 Plane Crash, दोन पायलट शहीद

MIG-21 Plane Crash: राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग विमान कोसळले आहे.

दैनिक गोमन्तक

MIG-21 Plane Crash: राजस्थानमधील बारमेरमध्ये मिग विमान कोसळले आहे. बारमेरच्या भीमडा गावात मिग विमान कोसळल्याची बातमी आहे. लोकांनी मोठ्या आवाजात आगीच्या प्रचंड ज्वाळा पाहिल्या. मिग अपघाताच्या बातमीने गावात घबराट पसरली आहे. दुसरीकडे, प्रशासन घटनास्थळी रवाना झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सीमावर्ती बारमेर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले.

दरम्यान, बारमेरचे जिल्हाधिकारी लोक बंधू यांनी सांगितले की, "बाइटू येथील भीमडा गावाजवळ हे हवाई दलाचे विमान (Plane) कोसळले." संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी हवाई दल प्रमुखांशी बोलून अपघाताची माहिती घेतली आहे. हवाईदल प्रमुखांनी त्यांना अपघाताची माहिती दिली आहे.

दुसरीकडे, मिग Mi-21 बायसन विमान 1960 च्या दशकात भारतीय हवाई दलाने समाविष्ट करण्यास सुरुवात केली. भारतीय हवाई दलाने गेल्या काही वर्षांत अनेक मिग-21 विमाने आणि इतर विमाने विविध अपघातांमध्ये गमावली आहेत. सध्या, भारतीय हवाई दलाकडे (Indian Air Force) मिग-21 बायसनचे सुमारे सहा स्क्वॉड्रन आहेत. एका स्क्वॉड्रनमध्ये सुमारे 18 विमाने येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT