Manipur Violence Dainik Gomantak
देश

Mizoram: मताई समाजाच्या सुरक्षेसाठी मिझोराम सरकारचा मोठा निर्णय

Mizoram: अशी शंका व्यक्त केली जात असल्याने मिझोरामच्या सरकारने हा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Mizoram: मणीपूरमध्ये 3 मे पासून सुरु असलेल्या वादाने आता भयंकर रुप धारण केले आहे. दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धींड काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतपाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे.

आता या वादाच्या पार्श्वभूमीवर मताई समाजाच्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करुन मिझोराम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मिझोरामची राजधानी आयझॉलमधील मताई समाजाच्या लोकांना त्यांच्या सुरक्षेबाबत आश्वस्त केले आहे.

राज्याचे गृह आयुक्त आणि सचिव एच लालेंगमाविया यांनी मताई समुदायाच्या नेत्यांची बैठक घेतली आणि त्यांना त्यांच्या सुरक्षिततेचे आश्वासन दिले, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, मणीपूरमधील कुकी समाजाच्या आदिवासींवर हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पून्हा मोठा संघर्ष होऊ शकतो अशी शंका व्यक्त केली जात असल्याने मिझोरामच्या सरकारने हा निर्णय घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वैती कॉलेज, सेलिसेह; मिझोराम विद्यापीठ, तान्हरील; Ripons, Zembach आणि ZMC, Falcon येथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आयझॉलमधून मतई लोकांना एअरलिफ्ट करण्याची सरकारची योजना असल्याची माहीती मिळाली आहे. मात्र कधी करणार ही माहीती याची अधिकृत माहीती मिळू शकली नाही.

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, PAMRA ने म्हटले आहे की मणिपूरमधील कुकी समुदयाच्या विरोधातील हिंसाचारामुळे मिझोच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच मिझोराममधील मैतई लोकांवर हल्ला झाला तर जबाबदारी ते स्वतः स्वीकारतील असा इशाराही या संघटनेने दिला आहे. मिझोरममधील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

मणिपूरमधील मैतईवासीयांच्या रानटी आणि घृणास्पद कृत्यांमुळे मिझोरममध्ये राहणे सुरक्षित राहिलेले नाही. PAMRA मिझोरामच्या सर्व मैतईंनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्यांच्या मूळ राज्यात परत जाण्याचे आवाहन करते," असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, मणिपूरमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. या संघर्षामध्ये 150 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत.

कुकी समाजाने आदिवीसी एकजुटता मोर्चा काढून मताई समाजाला जनजातीय सूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला विरोध केला होता. तेव्हापासून या संघर्षाला सुरुवात झाली आहे. आता या प्रकरणाला कोणते वळण लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT