Mehbooba Mufti  Dainik Gomantak
देश

Mehbooba Mufti slams BJP: गांधी-नेहरूंचा देश, भाजपचा होऊ देणार नाही!

मेहबुबा मुफ्तींचे केंद्राला आव्हान; भाजप संविधान संपवत असल्याची टीका

Akshay Nirmale

Mehbooba Mufti On BJP: जम्मू-काश्मिरमध्ये किती वाट्टेल तेवढे सैनिक तैनात करा, जोपर्यंत काश्मिरचा मुद्दा निकालात निघत नाही तोपर्यंत सकारात्मक परिणाम दिसणार नाहीत. गांधी-नेहरूंचा देश भाजपचा होऊ देणार नाही, असे आव्हान जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती केंद्र सरकार आणि भाजपला दिले आहे. (Jammu Kashmir News)

श्रीनगरमध्ये पक्षाच्या युवा संमेलनात त्या बोलत होत्या. मुफ्ती म्हणाल्या की, जेव्हा हल्लेखोर पाकिस्तानातून आले होते तेव्हा भारतीय सैन्य आले नव्हते. लोकांच्या हातात बंदुका नव्हत्या. पण तरीही लोकांनी त्या हल्लेखोरांना पळवून लावले होते. काश्मिरी जनतेला माहिती आहे, हल्लेखोऱांना कसे पळवून लावायचे ते. जेव्हा हिंदु आणि मुस्लीम धर्मावरून लढत होते तेव्हा काश्मिर हेच एकमेव ठिकाण होते जिथे मुस्लिमांनी काश्मिरी पंडित, हिंदू आणि शीखांना वाचवले होते.

मी आजच्या भारताविषयी बोलत नाही तर मी त्या भारताविषयी बोलत आहे जो भारत महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांचे नातू राहुल गांधी शोधत आहेत. नेहरू आणि गांधी यांनी जो भारत बनवला त्या भारताविषयी मी बोलत आहे. भाजपने संविधान संपवले आहे. गांधी-नेहरूंचा भारत आम्ही भाजपचा भारत बनू देणार नाही.

आम्हाला संविधानाचे नाते हवे होते, पण भाजप संविधानच नष्ट करत आहे. जर पंचायत निवडणुका तत्काळ घ्याव्यात, असे आवाहनही मुफ्ती यांनी केले. दरम्यान, आता भाजपवर तोंड सुख घेत असलेल्या मुफ्ती या भाजपसोबतच आघाडी करून जम्मू-काश्मिरध्ये सत्तेत राहिल्या होत्या. भाजपच्या पाठिंब्यावर त्या मुख्यमंत्री बनल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT