Supreme Court
Supreme Court Dainik Gomantak
देश

SC कडून हिंदू पक्षाला झटका, मथुरेच्या शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण होणार नाही!

Manish Jadhav

Mathura Sri Krishna Janmabhoomi-Shahi Idgah Masjid Dispute: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह मशीद वाद प्रकरणी हिंदू पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. एससीच्या या स्थगितीमुळे मथुरेच्या शाही इदगाह मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम थांबवण्यात आले आहे. सध्या या मशिदीची पाहणी केली जाणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 14 डिसेंबर रोजी मथुरेच्या शाही इदगाह मशिदीची पाहणी करण्यासाठी कोर्ट कमिशनरची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. यावर मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत उच्च न्यायालयात दाद मागितली.

मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, केवळ नियुक्त कोर्ट कमिशनर मशिदी परिसराचे सर्वेक्षण करतील. याविरोधात मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन म्हटले की, प्रार्थनास्थळ कायदा 1991 अन्वये हे प्रकरण रद्द करण्याची याचिका न्यायालयात प्रलंबित असताना उच्च न्यायालयाने तपासणीचा निर्णय कसा दिला.

सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद बरोबर मानला

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने मुस्लिम पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन उच्च न्यायालयाच्या 14 डिसेंबरच्या आदेशाला स्थगिती दिली. उच्च न्यायालयात प्रलंबित प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरुच राहील, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षणही थांबवण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT