Sonia Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: पोलिसांसमोरच नवऱ्याने बायकोला घातली गोळी, 8 महिन्यांपूर्वी प्रियकरासोबत...

Uttar Pradesh: मथुरा जिल्ह्यातील रिफायनरी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात मंगळवारी सकाळी पतीने घरात पोलिसांच्या उपस्थितीत पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: मथुरा जिल्ह्यातील रिफायनरी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात मंगळवारी सकाळी पतीने पोलिसांच्या उपस्थितीत पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. नवऱ्याने गोळी झाडली तेव्हा पोलिस दारात उभे होते. हत्येनंतर पती घराच्या मागील दाराने पळून गेला.

पोलिस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, रिफायनरी पोलिस (Police) स्टेशन हद्दीतील बहई गावात मंगळवारी सकाळी गंगा सिंह आणि पत्नी सोनिया (29) यांच्यात भांडण झाले, त्यावर सोनियाने 122 डायल करुन पोलिसांना बोलावले होते.

गोळी मारुन पती फरार झाला

पोलिसांनी सांगितले की, घरात प्रवेश करताच गंगा सिंहने पत्नीवर गोळी झाडली, ज्यामध्ये तिचा जागीच जीव गेला. तर गंगा सिंहने घटनास्थळावरुन पळ काढला.

गावकऱ्यांनी सांगितले की, गंगा सिंहची पत्नी सोनिया आठ महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती. विशेष म्हणजे, पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी तिच्या प्रियकराला अटक केली. प्रियकर सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी गंगा सिंहने एकूण 9 जणांविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT