Marcus Stoinis Engagement Dainik Gomantak
देश

Marcus Stoinis Engagement: मार्कस स्टॉइनिस साराच्या प्रेमात, भर समुद्रात दोघांनी एकमेकांना केलं प्रपोज, पाहा रोमँटिक PHOTOS

Marcus Stoinis: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टोइनिसने त्याची मैत्रीण सारा झारनुचला समुद्राच्या मध्यभागी एका बोटीवर प्रपोज केले. सारा आयपीएल सामन्यांसाठी अनेक वेळा भारतात आली आहे.

Sameer Amunekar

ऑस्ट्रेलियाचा लोकप्रिय अष्टपैलू क्रिकेटपटू मार्कस स्टॉइनिस आता वैयक्तिक आयुष्यात नवी इनिंग सुरू करणार आहे. त्याने आपल्या प्रेयसी आणि ऑस्ट्रेलियन मॉडेल सारा चार्नाच हिच्याशी साखरपुडा केला आहे.

दोघेही 2021 पासून रिलेशनशिपमध्ये असून, स्पेनमध्ये एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर बोटीत बसून स्टॉइनिसने साराला रोमँटिक अंदाजात प्रपोज केले. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

सारा चार्नाच कोण आहे?

सारा चार्नाच ही 27 वर्षीय ऑस्ट्रेलियन मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि ब्युटी एंटरप्रेन्योर आहे. तिचा जन्म 7 डिसेंबर 1997 रोजी व्हिक्टोरियातील साउथ गिलाँग येथे झाला. 2013 मध्ये तिने मिस टुरिझम ऑस्ट्रेलिया किताब जिंकून मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला.

त्यानंतर तिने डीकिन विद्यापीठातून पत्रकारिता आणि जनसंपर्क या विषयात पदवी घेतली आणि फॅशन व मीडिया क्षेत्रात आपला ठसा उमटवला. सारा सोशल मीडियावरही अत्यंत सक्रिय असून तिच्या इंस्टाग्रामवर 1.29 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती फिटनेस टिप्स, ब्युटी आणि फॅशन संबंधित कंटेंटसाठी विशेष लोकप्रिय आहे.

मार्कस स्टॉइनिसची क्रिकेट कारकीर्द

मार्कस स्टॉइनिस हा ऑस्ट्रेलियन संघासाठी एक विश्वासार्ह आणि प्रभावी ऑलराउंडर म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या दमदार फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे.

आत्तापर्यंत त्याने 71 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1495 धावा करताना 48 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 74 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 1245 धावा केल्या असून गोलंदाजीत 45 विकेट्स मिळवल्या आहेत. 2021 च्या टी20 विश्वचषक विजयात आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक विजयात स्टॉइनिसने महत्वाची आणि निर्णायक भूमिका बजावत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT