mans stunt with three dangerous king cobras hospitalized see viral video  Dainik Gomantak
देश

व्हिडिओ व्हायरल; 3 किंग कोब्रांसोबत केला स्टंट, झाला असा पलटवार...

या व्हायरल व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे

दैनिक गोमन्तक

सोशल मीडिया आता एक प्लॅटफॉर्म आहे जिथे दररोज काहीतरी व्हायरल होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेक वेळा सामान्य माणूसही रातोरात संपूर्ण देशात आणि जगभरात चर्चेत येतो. लोकांच्या नजरेसमोर यावे म्हणून अनेकवेळा लोक धोकादायक स्टंट करतात ज्यामुळे जीव धोक्यात येतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती तीन धोकादायक कोब्रा सापांशी खेळताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकचा (Karnataka) आहे. यामध्ये एक तरुण एक-दोन नव्हे तर तीन किंग कोब्रांसोबत स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओचा शेवट खूपच आश्चर्यकारक आहे. स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव मेजर सय्यद असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सय्यद तीन किंग कोब्रासोबत व्हिडिओ शूट करताना दिसत आहे.

हा तरुण तीन कोब्रा सापांना एका रेषेवर बसवतोय असे व्हिडिओमध्ये (video) दिसत आहे. यानंतर तो सर्वात लहान नागाची शेपटी पकडतो आणि त्याला त्याच्याकडे खेचतो. त्यानंतर तो आपले हात आणि पाय हलवतो. जणू तो सापांना स्वतःचे अनुकरण करण्यास सांगत आहे.

तरुण दुसऱ्या कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करताच सर्वात मोठा कोब्रा त्याच्या पायावर हल्ला करतो. काही वेळातच सय्यद नागाला हाताने पकडतो आणि कोब्राला सोडवण्याचा प्रयत्न करतो.

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या सोशल मीडिया (Social-media) अकाउंट ट्विटरवरून शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, कोब्राला सामोरे जाण्याचा हा सर्वात वाईट आणि धोकादायक मार्ग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT