PM Narendra Modi  Dainik Gomantak
देश

Mann Ki Baat: 1 ऑक्टोबरपासून देशभरात स्वच्छता मोहीम, PM मोदींनी केले खास आवाहन

Mann Ki Baat 105th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधला.

Manish Jadhav

Mann Ki Baat 105th Episode: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' या कार्यक्रमात देशवासीयांशी संवाद साधला. मन की बातचा 105 वा भाग आज प्रसारित झाला.

पीएम मोदी म्हणाले की, 'मन की बात'च्या आणखी एका एपिसोडमध्ये मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास सांगण्याची संधी मिळाली आहे. मला आलेली पत्रे आणि संदेश दोन विषयांवर आहेत.

पहिला विषय म्हणजे चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग आणि दुसरा विषय G-20 चे दिल्लीतील यशस्वी आयोजन.'

चांद्रयान-3 शी संबंधित नोंदींचा उल्लेख

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जेव्हा चांद्रयान-3 चे लँडर चंद्रावर उतरणार होते, तेव्हा कोट्यवधी लोक वेगवेगळ्या माध्यमातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत होते.

इस्रोच्या (ISRO) यूट्यूब लाईव्ह चॅनलवर 80 लाखांहून अधिक लोकांनी हा ऐतिहासिक क्षण पाहिला. हा एक रेकॉर्ड आहे. यावरुन कोट्यवधी भारतीयांची चांद्रयान-3 मोहिमेबद्दलची उत्सुकता दिसून येते.'

पर्यटन क्षेत्रातून रोजगार उपलब्ध होईल

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'कमीत कमी गुंतवणुकीत (Investment) जास्तीत जास्त रोजगार निर्माण करत असेल तर ते पर्यटन क्षेत्र आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्याही देशाबद्दल सद्भावना आणि आकर्षण खूप महत्त्वाचे असते.

गेल्या काही वर्षांत भारताविषयीचे आकर्षण खूप वाढले आहे आणि G-20 च्या यशस्वी आयोजनाने जगभरातील लोकांची भारताविषयीचे आकर्षन आणखी वाढले आहे.

मित्रांनो, G-20 साठी एक लाखाहून अधिक प्रतिनिधी भारतात आले. इथली विविधता, विविध परंपरा, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि आपला वारसा या सर्वांची ओळख त्यांना झाली.

येथे येणार्‍या प्रतिनिधींनी सोबत आणलेल्या अद्भुत अनुभवामुळे पर्यटनाचा आणखी विस्तार होईल.'

होयसडा मंदिर जागतिक वारसा स्थळ बनले

पीएम मोदी पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील शांती निकेतन आणि पवित्र होयसाडा मंदिराला जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यात आले आहे.

याबाबत मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एका प्राचीन संस्कृत श्लोकातून शांतीनिकेतनचे ब्रीदवाक्य घेतले होते. ते श्लोक आहे- 'यत्र विश्वं भवत्येक नीदम्'

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले कर्नाटकातील होयसाडा मंदिर 13व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेचा नमुना आहे. या मंदिराला UNESCO कडून मान्यता मिळणे हा देखील मंदिर बांधणीच्या भारतीय परंपरेचा सन्मान आहे.

भारतातील 42 जागतिक वारसा स्थळे

पंतप्रधान पुढे म्हणाले की, भारतातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या आता 42 वर पोहोचली आहे. आपली जास्तीत जास्त ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे जागतिक वारसा स्थळे म्हणून ओळखली जावीत यासाठी भारताचा प्रयत्न आहे.

मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, जेव्हाही तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा विचार कराल तेव्हा भारतातील विविधता पाहण्याचा प्रयत्न करा. विविध राज्यांची संस्कृती समजून घेण्यासाठी, हेरिटेज साइट्स पाहा.

याद्वारे, तुम्हाला तुमच्या देशाच्या गौरवशाली इतिहासाची ओळख तर होईलच, शिवाय स्थानिक लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही एक महत्त्वाचे माध्यम व्हाल.'

पंतप्रधानांनी जर्मन मुलीचे कौतुक केले

पीएम मोदी म्हणाले की, 'भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीताला नवी जागतिक ओळख प्राप्त झाली आहे. जगभरातील लोकांची भारतीय संस्कृती आणि संगिताविषयीची ओढ दिवसेंदिवस वाढत आहे.

21 वर्षीय कॅसमी सध्या इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. मूळची जर्मनीची असलेली कॅसमी कधीच भारतात आली नाही, पण ती भारतीय संगीताची चाहती आहे, जिने भारतही कधी पाहिला नाही. भारतीय संगीतातील तिची आवड खूप प्रेरणादायी आहे.

भारतीय संस्कृती आणि संगीताबद्दल कॅसमीच्या उत्कटतेचे मी मनापासून कौतुक करतो. तिचे प्रयत्न प्रत्येक भारतीयाला भारावून टाकेल.'

पंतप्रधान मोदींचे खास आवाहन

मन की बातमध्ये विनंती करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मला मन की बातच्या माध्यमातून सर्व देशवासियांना एक विनंती करायची आहे. रविवार, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छतेचा मोठा कार्यक्रम होणार आहे. तुम्हीही वेळ काढून स्वच्छतेच्या या मोहिमेत सहभागी व्हावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT