Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: प्रेत समजून पोलिस अन् ॲम्ब्युलन्सला बोलावलं, पण नंतर जे घडलं, ते पाहून सगळेच थक्क; पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल!

Sleeping Man Video: हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पोत्यात पूर्णपणे झाकून झोपलेला दिसत आहे.

Manish Jadhav

Sleeping Man Video: गरीबी माणसाला काय काय करायला लावते! कधी चटई किंवा पोत्यात झोपायला भाग पाडते, तर कधी तेही मिळत नाही आणि जमिनीवरच झोपण्याची वेळ येते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला दया येणार नाही, तर हसू येईल. या व्यक्तीला लोकांनी 'प्रेत' समजून पोलीस आणि ॲम्ब्युलन्सला बोलावले, पण नंतर जे घडले, त्याने सर्वांनाच धक्का बसला.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हिडिओमध्ये काय पाहिले?

दरम्यान, हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून त्यात एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पोत्यात पूर्णपणे झाकून झोपलेला दिसत आहे. त्याला पाहिल्यानंतर कोणालाही वाटेल की तो मृतदेह आहे. तिथून जाणाऱ्या लोकांनाही असेच वाटले. पाहता पाहता तिथे मोठी गर्दी जमा झाली. यानंतर तात्काळ पोलिसांना बोलावण्यात आले आणि ॲम्ब्युलन्सलाही फोन करण्यात आला.

घडल्या प्रकाराने सारेच थक्क

जेव्हा गर्दीचा आणि पोलिसांचा (Police) आवाज वाढू लागला, तेव्हा ती व्यक्ती अचानक उठली. उठल्यानंतर तिने पोते घेतले आणि अशी निघून गेली, जसे काही झालेच नाही. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि काही जणांना तर हसूही आवरता आले नाही. 'तुम्ही लोक शांतपणे झोपूही देत नाही', अशा शब्दांत त्या व्यक्तीने तिथून जाताना आपली नाराजीही व्यक्त केली.

हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) @askshivanisahu नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, "किती तेजस्वी लोक आहेत. लोक जमा झाले, पोलीसही आले, सर्वांना वाटले की कोणीतरी मृतदेह टाकला आहे. पोलिसांनी आपले काम सुरु केले, ॲम्ब्युलन्सलाही बोलावले. पण जेव्हा जास्त गोंगाट झाला, तेव्हा तो माणूस उठून निघून गेला आणि म्हणाला की, तुम्ही लोक शांतपणे झोपूही देत नाही. आता सांगा, चूक कोणाची आहे?"

या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि युजर्संनीही मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, "म्हणूनच म्हणतात, आधी नीट तपासणी करावी. पुढच्या वेळी असे काही झाल्यास आधी दगड मारुन तपासणी करुन घ्या." तर दुसऱ्याने लिहिले की, "बिचारा गरीब माणूस डासांपासून वाचण्यासाठी पोत्यात झोपला होता."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

SCROLL FOR NEXT