Man arrested for marrying 6 women from 6 states while pretending to be PMO officer and army doctor Arrested in Odisha:
ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सला मोठे यश मिळाले आहे. पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी (PMO) आणि लष्करी डॉक्टर असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
सय्यद इशान बुखारी असे या लबाड आरोपीचे नाव असून, त्याचे पाकिस्तानमधील अनेक लोकांशी आणि केरळमधील संशयित घटकांशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्याने अनेक राज्यांतील अनेक महिलांशी विवाहही केला आहे.
ओडिशा एसटीएफनुसार, 37 वर्षीय सय्यद इशान बुखारी उर्फ डॉ. इशान बुखारी याला ओडिशातील नेउलपूर गावातून अटक करण्यात आली आहे.
एसटीएफचे महानिरीक्षक जेएन पंकज म्हणाले, "स्वत:ला न्यूरो-स्पेशालिस्ट डॉक्टर म्हणून वर्णन करणाऱ्या बुखारी याने स्वत:ला आर्मी डॉक्टर, पीएमओ अधिकाऱ्यासह राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) वरिष्ठ अधिकाऱ्याचा जवळचा सहकारी म्हणूनही सादर केले. तो मूळचा कुपवाडा, काश्मीरचा रहिवासी आहे.
पोलीस महानिरिक्षक पंकज म्हणाले, "तपासात समोर आले आहे की, आरोपीने फसवणूक करून काश्मीर, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिशासह भारताच्या विविध भागांतील किमान 6-7 महिलांशी लग्न केले आहे. तो आंतरराष्ट्रीय पदवी घेऊन डॉक्टर असल्याचे भासवत होता. तसेच तो अनेक स्त्रियांसोबत संबंधांमध्ये आहे."
फसवणूक आणि फसवेगीरीच्या गुन्ह्यात आरोपी काश्मीरमध्येही हवा आहे आणि काश्मीर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, असे ते म्हणाले.
आयजी म्हणाले, "आमच्याकडे आरोपीच्या सर्व गुन्ह्यांविरोधात पुरेसे पुरावे आहेत. दहशतवादी कटात त्याचा सहभाग असल्याबद्दल काहीही सांगणे घाईचे आहे, परंतु त्याचे पाकिस्तानशी काही संबंध होते आणि त्याची पुष्टी केली जाईल."
ते म्हणाले, "तो पाकिस्तानी गुप्तहेर होता हे आम्ही नाकारू शकत नाही, परंतु आमच्याकडे अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत. आम्ही एनआयएच्या संपर्कात आहोत."
एसटीएफ अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, 15 डिसेंबर रोजी मिळालेल्या टिप-ऑफच्या आधारे, स्थानिक पोलिसांसह एसटीएफने बुखारीविरुद्ध कारवाई केली आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटीएफच्या म्हणण्यानुसार, आरोपीवर टाकलेल्या छाप्यादरम्यान, 100 हून अधिक कागदपत्रांसह आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
यामध्ये अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठाने जारी केलेली वैद्यकीय पदवी प्रमाणपत्रे, कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस, वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेज इत्यादी अनेक बनावट कागदपत्रांचा समावेश आहे.
याशिवाय आरोपींकडून कोरी कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, बाँड, अनेक ओळखपत्रे, एटीएम कार्ड, कोरे धनादेश, आधार कार्ड आणि व्हिजिटिंग कार्डही जप्त करण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.