Lata Mangeshkar And Mamata Banerjee Dainik Gomantak
देश

ममता बॅनर्जींनी वाहिली लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली

15 दिवस पश्चिम बंगालमधील सार्वजनिक ठिकाणे, सरकारी इमारती आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांची गाणी वाजवली जातील.

दैनिक गोमन्तक

लता मंगेशकर यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे, देशातील अनेक राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांमध्ये राजकीय शोक सुध्दा जाहीर केला आहे. लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत जाणार आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लतादीदींना एक वेगळीच श्रद्धांजली वाहिली आहे. (Lata Mangeshkar And Mamata Banerjee)

15 दिवस सार्वजनिक ठिकाणी वाजवली जाणार लता दीदींची गाणी.

लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की, "पुढील 15 दिवस पश्चिम बंगालमधील सार्वजनिक ठिकाणे, सरकारी इमारती आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांची गाणी वाजवली जातील."

सोमवारी राज्यात अर्धा दिवस सुट्टी जाहीर

याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या सन्मानार्थ सोमवारी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली. तसंच पश्चिम बंगालमध्ये उद्याचा सर्व शासकीय कार्यालयांना 'हाफ डे' जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयं उद्या अर्धा दिवसच कामकाज केलं जाणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की मंगेशकरांच्या आवाजाने मी मंत्रमुग्ध होत होती. मंगेशकर यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना दिलेल्या स्नेहाबद्दल ममता बॅनर्जी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

लतादीदी खऱ्या अर्थाने भारताच्या कोकीळा

मुख्यमंत्र्यांनी (Mamata Banerjee) ट्विट केले की, 'देशातील महान व्यक्तिमत्त्व, भारतरत्न लता मंगेशकर यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल आणि जगभरातील त्यांच्या अब्जावधी चाहत्यांसाठी माझ्या मनापासून संवेदना. लतादीदी खऱ्या अर्थाने भारताच्या कोकीळा होत्या. बॅनर्जी म्हणाले, "जगभरातील त्यांचे सर्व चाहते आणि हितचिंतकांप्रमाणेच, त्यांच्या आवाजाने आणि अभिनयाने मी सुध्दा मंत्रमुग्ध होतहोते. त्यांनी बंगाल आणि पूर्व भारतातील कलाकारांना दिलेल्या आपुलकीबद्दल आणि त्यांनी संगीताला अद्भुत जगाचा अविभाज्य भाग मानल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT