North East Express Dainik Gomantak
देश

North East Express Train Accident: बिहारमध्ये नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात, 6 डबे रुळावरुन घसरले; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता

Manish Jadhav

North East Express Train Accident: बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. रघुनाथपूर स्टेशनच्या डाऊन लाईनवर नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसला अपघात झाला. सहा डबे रुळावरुन घसरले आहेत. अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

मात्र मृतांच्या संख्येबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, स्थानकात गोंधळाची परिस्थिती आहे. गावकरी बचावकार्यात गुंतले आहेत.

आतापर्यंत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डाउन नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसचे 6 डबे रुळावरुन घसरले आहेत. पीडीडीयू-पाटणा रेल्वे विभागाच्या रघुनाथपूर स्थानकाजवळ हा अपघात झाला. कोच क्रमांक B7 आणि B8 चे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, सीमांचल एक्स्प्रेस, गुवाहाटी राजधानी, विभूती एक्स्प्रेस, पंजाब मेलसह इतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहेत. वाराणसीहून किउलला दुसऱ्या मार्गाने गाड्या पाठवल्या जात आहेत. 12149 दानापूर पुणे एक्सप्रेस फक्त दानापूर येथे उभी आहे.

रिलीफ ट्रेन घटनास्थळी रवाना झाली आहे. दानापूरचे डीआरएम जयंत कुमार चौधरी आणि वरिष्ठ डीसीएम सरस्वती चंद्रा घटनास्थळी रवाना झाले आहेत.

क्रॅश झालेल्या नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेसमधून प्रवास करत असलेल्या आराहच्या बाबू बाजार येथील अशोक यांनी सांगितले की, ते आणि आराह येथील सामाजिक कार्यकर्त्या मंगलम यांची आई तीन सहकाऱ्यांसोबत प्रवास करत होते.

रात्री 8.30 च्या सुमारास ते विंध्याचलहून बसले होते. दरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या महिलेच्या पायाला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची (Accident) माहिती मिळताच मंगलम यांनी घटनास्थळी तात्काळ पोहोचून आईसह सोबत असलेल्या आराह येथील लोकांना कारमधून नेले.

रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केला

पाटणा - 9771449971

दानापूर - 8905697493

आराह - 8306182542

कंट्रोल नंबर– 7759070004

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT