Mahua Moitra
Mahua Moitra  Dainik Gomantak
देश

Cash For Query Case: एथिक्स समिती महुआ मोईत्रा यांच्यावर मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, मोइत्रा म्हणाल्या...

Manish Jadhav

Cash For Query Case: लाच घेतल्याच्या कथित प्रकरणात सहभागी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. पंतप्रधान मोदी आणि अदानी समूहाविरुद्ध पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप मोइत्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

लोकसभेची एथिक्स कमिटी मोइत्रा यांच्याविरोधातील रिपोर्ट स्वीकारण्यास तयार आहे. त्यासाठी (मंगळवार) 28 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. रिपोर्ट स्वीकारणे आणि बैठक बोलावणे म्हणजे भाजपचे खासदार विनोदकुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तपास पूर्ण केला असून आता ती आपल्या शिफारसी करेल. खासदार महुआ मोईत्रा अपात्र ठरु शकतात.

याआधी, रविवारी खासदार महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून भाजप सरकारवर निशाणा साधला होता. भाजप आपल्यावर फौजदारी खटला चालवण्याची योजना आखत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

समिती कठोर कारवाईची शिफारस करु शकते

एचटी मीडिया रिपोर्टनुसार, समितीच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, समिती मोईत्रा यांच्यावर कठोर कारवाई करण्याची शिफारस करु शकते. ज्यामध्ये लोकसभेच्या उर्वरित अधिवेशनासाठी अपात्रतेचाही समावेश असू शकतो.

सूत्रांचे म्हणणे आहे की, समिती 2005 च्या संबंधित कॅश-फॉर-क्वेरी केसची मदत घेऊ शकते. त्यावेळी 11 खासदारांवर पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला होता. नंतर त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते.

महुआ यांनी त्यांच्यावर वैयक्तिक प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता

दरम्यान, महुआ मोईत्रा 2 नोव्हेंबर रोजी एथिक्स समितीसमोर हजर झाल्या होत्या. दुपारी अचानक मोईत्रा यांच्यासह विरोधी सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी वॉकआऊट केले. मोइत्रा यांनी आरोप केला होता की, रात्री त्या कोणाशी बोलतात असे त्यांना विचारण्यात आले होते. निर्लज्ज आणि बेताल प्रश्न विचारले गेले. प्रवास, हॉटेलमधील मुक्काम आणि टेलिफोन कॉल्सबाबत वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुसरीकडे, भाजप (BJP) खासदार निशिकांत दुबे आणि वकील जय अनंत देहादराई यांनी केलेल्या आरोपांची दखल घेण्यासाठी मोईत्रा यांना समितीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.

माझ्याकडे एथिक्स समितीमधील रेकॉर्ड प्रत आहे

मोइत्रा यांनी रविवारी आरोप केला की, भाजप आपल्याविरुद्ध गुन्हेगारी खटल्यांची योजना आखत आहे. त्यांनी ट्विट करुन लिहिले की, 'भाजप खोट्या स्टोरीसह महिला खासदारांची हकालपट्टी करण्यापूर्वी माझ्याकडे एथिक्स समितीच्या रेकॉर्डची कॉफी आहे.'

तसेच, भाजप माझ्यावर गुन्हेगारी खटल्यांची योजना आखत आहे हे जाणून मी हादरले, असेही त्यांनी लिहिले आहे. माझ्याकडे चपलांच्या किती जोड्या आहेत हे विचारण्यापूर्वी कृपया जाणून घ्या की 1 लाख 30 हजार कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी अदानी समूहाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची गरज आहे.

आयडी दुबईहून लॉग इन केला होता

लाचेच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरुन अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.

दुबईतून प्रश्न विचारण्यासाठी हिरानंदानी यांनी महुआ मोइत्रा यांचा संसदीय लॉगिन आयडी वापरला. विशेष म्हणजे, मोईत्रा यांनी कबूल केले की, हिरानंदानी यांनी त्यांचे लॉगिन वापरले. परंतु लाच घेतल्याचे आरोप फेटाळले. त्यांनी युक्तिवाद केला की, बहुतेक खासदार त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स इतरांसोबत शेअर करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Comunidade: मडगाव कोमुनिदादमधील 'त्या' कागदपत्रांना धोका

Goa Assembly Monsoon Session 2024: हळदोणेत आरोग्य सुविधा द्या; कार्लुस फेरेरा यांची मागणी

Goa Weather Update: गोव्यात पावसाचा कहर सुरुच! पाच दिवस 'ऑरेंज अलर्ट'; मुसळधार पावसाची शक्यता!

Goa Today's News Live: आमचा व्यवसाय हिरावून घेतला, कोलवातील टॅक्सी चालकांचा दावा

Goa Assembly Monsoon Session 2024 ‘अस्मिताय दिन’बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; आलेमाव यांचा ठराव मागे

SCROLL FOR NEXT