Arun Gandhi Dainik Gomantak
देश

Arun Gandhi: महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे कोल्हापुरात निधन

89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pramod Yadav

Arun Gandhi: महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. अरुण गांधी यांचा मुलगा तुषार गांधी यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. अरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

आज कोल्हापुरातच वडिलांचा अंत्यसंस्कार होणार असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले.

अरुण गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केलं होतं. अरुण गांधी महात्मा गांधी यांचे नातू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते.

1946 च्या दरम्यान अरुण गांधी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी कोल्हापूर मधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते.

अरुण मणिलाल गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1934 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे झाला. त्यांचे वडील इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्यांची आई त्याच वृत्तपत्रात प्रकाशक होती. अरुण गांधी यांनी नंतर त्यांच्या आजोबांचा मार्ग अवलंबला आणि सामाजिक-राजकीय मुद्द्यांवर कार्यकर्ते म्हणून काम केले.

अरुण गांधी यांनीही काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी 'द गिफ्ट ऑफ अँगर: अँड अदर लेसन फ्रॉम माय ग्रॅन्डफादर महात्मा गांधी' हे एक महत्वाचे पुस्तक आहे. अरुण गांधी 1987 मध्ये कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले. येथे त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे मेम्फिस, टेनेसी येथे घालवली. येथे त्यांनी ख्रिश्चन ब्रदर्स विद्यापीठात अहिंसेशी संबंधित एक संस्थाही स्थापन केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"99 प्रॉब्लेम्स आहेत, पण नवऱ्याची कटकट नाही", दक्षिणी अभिनेत्रीचे डिवोर्स फोटोशूट; नेटकरी थक्क

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा धमाका! 'किंग कोहली'ला टाकले मागे; नावावर केला मोठा विक्रम

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

SCROLL FOR NEXT