Mahatma Gandhi to be felicitated with USA's greatest honor Dainik Gomantak
देश

महात्मा गांधींना अमेरिकेतील सर्वोच्च मनाचा पुरस्कार, संसदेत प्रस्ताव

अमेरिकेत (USA) महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) देशातील सर्वोच्च नागरी सन्मान (USA's greatest honor)देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये (American Congress) पुन्हा एक ठराव मांडण्यात आला आहे

दैनिक गोमन्तक

अमेरिकेत (USA) महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) देशातील सर्वोच्च नागरी सन्मान (USA's greatest honor)देण्यासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये (American Congress) पुन्हा एक ठराव मांडण्यात आला आहे.न्यूयॉर्कमधील (New York) एका अमेरिकन खासदाराने शुक्रवारी अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात शांतता आणि अहिंसेला ( Peace and non-violence) प्रोत्साहन देण्यासाठी महात्मा गांधी यांना प्रतिष्ठित कॉंग्रेसचे सुवर्णपदक देण्याचा प्रस्ताव पुन्हा एकदा सादर केला आहे .जर हा पुरस्कार मिळाला तर देशाची मन अभिमानाने उंचावेल कारण अमेरिकन कॉंग्रेसचे सुवर्णपदक मिळणारे महात्मा गांधीं हे पहिले भारतीय असतील. (Mahatma Gandhi to be felicitated with USA's greatest honor)

यापूर्वी हा सन्मान जॉर्ज वॉशिंग्टन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, मदर टेरेसा आणि रोझा पार्क्स सारख्या महान व्यक्तींना देण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या ऐतिहासिक सत्याग्रहने अहिंसक प्रतिकाराच्या चळवळीने अनेक राष्ट्र आणि जगाला प्रेरणा दिली आहे.त्यांचे व्यक्तिमत्व इतरांच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करण्यास प्रोत्साहन देत असते.

कॉंग्रेसनल गोल्ड मेडल हा युनायटेड स्टेट्स काँग्रेसतर्फे दिलेला सर्वोच पुरस्कार मानला जातो. एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेने दिलेल्या आपल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. लष्करातून देशासाठी सेवा दिलेल्या सैनिकांसाठी हा मनाचा पुरस्कार देण्याची प्रथा अमेरिकन क्रांती दरम्यान सुरू झाली होती. नंतर ही प्रथा सर्व क्षेत्रातील व्यक्तींसाठी सुरू झाली.

महात्मा गांधी यांनी अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.तसेच ते सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. इ.स. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली.आणि अशा मार्गानेच त्यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले.

आणि या स्वातंत्र्याला उद्या म्हणजेच १५ औगस्ट २०२१ रोजी ७५ वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच पूर्वसंध्येला अमेरिकेन खासदाराने मांडलेला हा प्रस्ताव देशाला सुखद धक्का देणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT