MahaMrityunjaya Yagna in Ayodhya Dainik Gomantak
देश

अयोध्येमध्ये महामृत्युंजय यज्ञ! पंतप्रधान मोदी घेणार लता मंगेशकर यांची भेट

92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी अयोध्येमधील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये राजसूय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमन्तक

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर गेल्या 18 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. शनिवारी 8 जानेवारी रोजी त्यांना करोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्याने मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशभरामधून चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत. असं असतानाच लता मंगेशकरयांच्यासाठी (Lata Mangeshkar) अयोध्येमध्ये महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्यात आला आहे.

92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी अयोध्येमधील (Ayodhya) आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीमध्ये राजसूय महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायज्ञ तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी महामृत्युंजय आणि संकटमोचन हनुमानाच्या मंत्रांचा जप करम्यात आला. तसेच वेदमंत्रांच्या उच्चारांसहीत यज्ञशिलेमध्ये आहुती देखील समर्पित करण्यात आली.

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी यासंदर्भात प्रतिक्रियाही दिली आहे. “गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला आहे. मी पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) विनंती करतो की त्यांनी लता मंगेशकर यांची भेट घ्यावी,” असं जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज म्हणाले. लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतित समदानी यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. ‘लतादीदींच्या प्रकृतीत कालपासून सुधारणा होत आहे. मात्र तरीही त्यांना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्या लवकरात लवकर ठिक व्हाव्यात यासाठी प्रार्थना करा’, असं डॉक्टर समदानी म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT