Madras High Court Dainik Gomantak
देश

'भाषणस्वातंत्र्य म्हणजे द्वेष पसरवणे नव्हे...', सनातन वादावर हायकोर्टाचे खडे बोल

Madras High Court: सनातन धर्माबाबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

Manish Jadhav

Madras High Court: सनातन धर्माबाबत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले की, 'सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा एक समूह आहे, ज्यामध्ये राष्ट्र, राजा, माता-पिता आणि गुरुंप्रती कर्तव्ये आणि गरिबांची काळजी घेणे समाविष्ट आहे.'

एलंगोवन नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एन शेषशायी यांनी हे निरिक्षण नोंदवले.

या याचिकेत स्थानिक शासकीय कला महाविद्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकाला आव्हान देण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 'सनातनला विरोध' या विषयावर त्यांचे मत मांडण्यास सांगितले होते.

न्यायमूर्ती शेषशायी यांनीही सनातन धर्माबाबत सुरु असलेल्या वादावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'सनातन धर्म पूर्णपणे जातिवाद आणि अस्पृश्यतेला प्रोत्साहन देत आहे, या विचाराने जोर धरला आहे.' असा समज त्यांनी साफ फेटाळून लावला.

न्यायमूर्ती पुढे म्हणाले, 'समान नागरिक (Citizens) असलेल्या देशात अस्पृश्यता खपवून घेतली जाऊ शकत नाही. जरी हे 'सनातन धर्म' च्या तत्त्वांमध्ये कुठेतरी अनुज्ञेय म्हणून पाहिले जाते.

तरीही त्याला समाजात स्थान असू शकत नाही, कारण राज्यघटनेच्या कलम 17 मध्ये अस्पृश्यता नाहीशी करण्यात आली आहे.

भाषणांनी कोणाचे मन दुखावले जाऊ नये : उच्च न्यायालय

न्यायमूर्तींनी यावर जोर दिला की, भाषण स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे, परंतु तो द्वेषयुक्त भाषणांना परवानगी देत ​​​​नाही. विशेषत: जेव्हा ते धर्माशी संबंधित असते. अशा भाषणांनी कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, 'प्रत्येक धर्म श्रद्धेवर आधारित असतो आणि श्रद्धेमध्ये नेहमी अतार्किकता समाविष्ट असते.

त्यामुळे धर्मासंबंधित बाबींवर जेव्हा मुक्त भाषण दिले जाते तेव्हा त्यामुळे कोणाचेही मन दुखावणार होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सोप्या शब्दांत, मुक्त भाषण द्वेषयुक्त भाषण असू शकत नाही.

उदयनिधी स्टॅलिन सनातनबद्दल काय म्हणाले होते

तामिळनाडूचे (Tamil Nadu) मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्मावरील वक्तव्यावरुन झालेल्या गदारोळात न्यायालयाची ही टिप्पणी आली आहे, हे विशेष आहे. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांशी केली होती.

नंतर उदयनिधी म्हणाले की, मी सनातनबद्दल असे काहीही बोललो नाही, जे पेरियार ईव्ही रामासामी, बीआर आंबेडकर आणि अण्णादुराई यांनी सांगितले नव्हते.

ते पुढे म्हणाले होते की, सनातनबद्दलचे त्यांचे विचार केवळ अशा दिग्गजांच्या सुधारणावादी, सामाजिक न्याय विचारसरणीचे प्रतिबिंबित करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT