Rajesh Kannauj Dainik Gomantak
देश

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत सहभागी होणं शिक्षकाला पडलं महागात, विभागानं उचललं हे पाऊल

Bharat Jodo Yatra: काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणे मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले.

दैनिक गोमन्तक

Bharat Jodo Yatra: काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणे मध्य प्रदेशातील एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. शिक्षण विभागाने त्यांना निलंबित केले आहे. ही घटना बरवानी जिल्ह्यातील आहे. 24 नोव्हेंबर रोजी कुंझरी येथील शासकीय प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कन्नौजे हे तेथून निघालेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबतचा कन्नौजे यांचा फोटो व्हायरल होत आहे. राजेश यांनी सांगितले की, 'राहुल गांधींनी मला मिठी मारली. त्यांनी माझे नाव आणि परिचय विचारला. समाजाचे प्रश्न अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांसमोर मांडत असल्याचे मी त्यांना सांगितले. माझा कोणत्याही पक्षीय राजकारणाशी संबंध नाही.'

या नियमांचे उल्लंघन केल्याचे विभागाने सांगितले

पुढे रजेचा अर्ज केल्यानंतर या यात्रेत सहभागी होण्यासाठी गेल्याचे कन्नौजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर विभागाने निलंबन पत्रात हे सरकारी नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. राजेश कन्नौजे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

माहितीनुसार, आदिवासी विभागाचे सहाय्यक आयुक्त, नीलेश रघुवंशी यांनी कुंजरी येथील शासकीय प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश कन्नौजे यांना तत्काळ निलंबित केले आहे. आदेशात, राजेश कन्नौजे यांचा 24 नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह राजकीय रॅलीत सहभागी होणे हे नागरी सेवा आचार नियमांचे उल्लंघन मानले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT