Indian Meteorological Department Dainik Gomantak
देश

मध्य प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये उष्णतेची लाट कायम

''अरुणाचल प्रदेश, आसाम,मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये पावसाची दाट शक्यता''

दैनिक गोमन्तक

भारतीय हवामान खात्‍याने दिलेल्या माहिनुसार यंदा मॉन्‍सूनचे आगन लवकर होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार केरळमध्ये यंदा मॉन्‍सून 27 मे रोजी दाखल होण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यांना गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. ( Madhya Pradesh, Bihar, Jharkhand heat wave continues today ? )

हवामान खात्‍याने आज काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. यानुसार मध्य प्रदेश, बिहार, झारखंडमधील काही भागात उष्णतेची लाट कायम राहू शकते. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात घट होत आहे. बहुतांश राज्यांमध्ये तापमानात घट होत असल्याची दिलासादायक माहिती आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीचे किमान तापमान 30 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. अहमदाबाद, गुजरातमध्येही असेच हवामान राहणार आहे. डेहराडूनमध्ये आजचे किमान तापमान 22 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस राहणार आहे. जयपूर, राजस्थानमध्ये आजचे किमान तापमान 29 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस राहणार आहे.

'या' राज्यांमध्ये आज पावसाची दाट शक्यता

हवामान खात्याने आज अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये आजसह पाच दिवस पाऊस पडेल. याशिवाय आज मिझोराम, त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता आहे. केरळ, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, लक्षद्वीपमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT