Crime News Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: अपहरणानंतर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, आरोपी गजाआड!

Crime News: इटौंजा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार तिवारी यांनी सांगितले की, दोघांविरुद्ध सामूहिक बलात्कारासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: लखनऊमध्ये पोलिसांनी दोन तरुणांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. दोघांविरुद्ध अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इटौंजा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार तिवारी यांनी सांगितले की, दोघांविरुद्ध सामूहिक बलात्कारासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचवेळी, आरोपीची चौकशी केल्यानंतर लखनऊ पोलिसांनी बलात्कार पीडितेचे मेडिकलही करुन घेतले आहे. मेडिकल रिपोर्टमध्ये पीडितेवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि इर्शाद अशी अटक करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी (Accused) गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मुलीचा छळ करत होते. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी अमृत सरोवराकडे सायकलने फिरायला गेली होती, मात्र ती न परतल्याने कुटुंबीयांना संशय आला.

यानंतर नातेवाईक तिचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले. शोध घेत असतानाच एका ठिकाणी मुलीची सायकल सापडली. त्याठिकाणी मुलीच्या किंकाळ्याही ऐकू आल्या.

त्यानंतर आईने पाहिले की, दोन तरुणांनी तिला पकडून ठेवले आहे. आईने मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही नराधमांनी तिलाही मारहाण केली आणि मारहाण करुन तिचा पाठलाग करुन पळ काढला.

घटनेनंतर ते फरार झाले होते

घटनेनंतर पीडितेच्या आईने पोलिसांशी (Police) संपर्क साधून घटनेची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांना अटक केली.

पीडित तरुणीचा जबाबही नोंदवण्यात आला असून अटक करण्यात आलेल्या तरुणांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

Viral Video: रील्ससाठी तरुणाईची अजब क्रेझ! म्हशीच्या पाठीवर उभ राहून पोरीचा डान्स; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Sachin Tendulkar: क्रिकेटच्या देवासाठी '14 ऑगस्ट' खास! आजच्याच दिवशी ठोकलं होतं पहिलं कसोटी शतक; 35 वर्षांनंतरही 'त्या' रेकॉर्डची आठवण कायम

Kishtwar Cloud Burst: 33 मृत्यू, 200 हून अधिकजण बेपत्ता! ढगफुटीने किश्तवाडमध्ये हाहाकार, बचावकार्य सुरु; PM मोदींनी व्यक्त केल्या संवेदना

कोमुनिदादींच्या जमिनीवरील बेकायदा घरे कायदेशीर करण्याच्या विधेयकाला विरोध; २४ ऑगस्टला खास बैठक

SCROLL FOR NEXT