Gas Cylinder Price Reduce Dainik Gomantak
देश

LPG Price Cut: सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता, रक्षाबंधनापूर्वी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

Gas Cylinder Price Reduce: रक्षाबंधनापूर्वी एलपीजीच्या किमतीत मोठा बदल करण्यात आला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजीची किंमत स्वस्त झाली आहे.

Sameer Amunekar

रक्षाबंधनाच्या आधी एलपीजीच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची कपात केली आहे. एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत आजपासून म्हणजेच १ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाली आहे. तथापि, एलपीजीच्या किमतीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

१४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. १४ किलो सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ८ एप्रिल रोजी करण्यात आला होता, परंतु त्यानंतर कोणताही बदल झालेला नाही. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर एलपीजीच्या किमतीत कपात होण्याची अपेक्षा होती, परंतु अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

दिल्ली ते मुंबई व्यावसायिक सिलिंडरची किंमत

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, १ ऑगस्टपासून नवीन किमती लागू - दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १,६३१.५० रुपये झाली आहे. पूर्वी त्याची किंमत १,६६५ रुपये होती. जुलै २०२५ मध्ये कोलकातामध्ये १९ किलो सिलिंडरची किंमत १,७६९ रुपये आणि मुंबईत १,६१६.५० रुपये होती. येथेही प्रत्येक १९ किलो सिलिंडरवर ३३ रुपये कपात करण्यात आली आहे.

  • दिल्लीत सध्या १६३१.५० रुपये आहे, जे १६६५ रुपये होते.

  • कोलकातामध्ये नवीन किंमत १७३४.५० रुपये आहे, पूर्वी १७६९ रुपये होते.

  • मुंबईमध्ये नवीन दर १५८२.५० रुपये आहे, पूर्वी १६१६ रुपये होते.

  • चेन्नईमध्ये नवीन किंमत १७८९ रुपये आहे, पूर्वी १८२३.५० रुपये होते.

कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात झाल्याने, केटरिंग, हॉटेल-रेस्टॉरंट्स आणि अन्न उद्योगाशी संबंधित व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. ते सर्वजण कमर्शियल एलपीजी सिलिंडर वापरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT