loudspeaker controversy one killed in gujarat mehsana after playing loudspeaker in temple Dainik Gomantak
देश

गुजरातमध्ये लाऊडस्पीकर वादावरून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

लोखंडी रॉडने केली मारहाण, 6 जणांवर गुन्हा दाखल

दैनिक गोमन्तक

मेहसाणा जिल्ह्यात मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याने झालेल्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या माहितीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रकरण मुंदर्डा गावातील ठक्कोर वासचे आहे. (loudspeaker controversy one killed in gujarat mehsana after playing loudspeaker in temple)

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी मुंदर्डा येथील रहिवासी 46 वर्षीय अजितजी ठाकोर हे त्यांचे लहान भाऊ जसवंतजी ठाकोर यांच्यासह घराच्या आवारात बांधलेल्या मंदिरात पुजा करत होते. पूजेनंतर त्यांनी लाऊडस्पीकरवर भजन केले. थोड्या वेळाने शेजारी राहणारे सदाजी ठाकोर तिथे पोहोचले आणि त्यांनी अजितजींना विचारले की तुम्ही लाऊडस्पीकर का वाजवत आहात?

आरोपींनी लाकडी व लोखंडी रॉडने मारहाण केली

अजितजी म्हणाले की संध्याकाळ झाली आहे, दिवा लावल्यावर मंदिरात लाऊडस्पीकर वाजतो. यानंतर सदाजी ठाकोर तेथून निघून गेले आणि थोड्या वेळाने सहा जणांसह अजितजींच्या घरी पोहोचले. त्यानंतर सर्वांनी मिळून अजितजी आणि जसवंतजींना मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींनी दोन्ही भावांना लाकडी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जसवंतजी आणि अजितजी गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मृताच्या आईने पोलिसांना दिली

यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या अजितजी आणि जसवंतजींच्या आई हंसा बेन यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, दोन्ही जखमींना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मेहसाणा येथून अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. येथे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी जसवंतजी ठाकोर यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला

पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनोदजी ठाकोर यांचा ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT