lok sabha in konkani Dainik Gomantak
देश

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Konkani Language in Parliament: लोकसभेचे संपूर्ण कामकाज कोकणी भाषेत थेट ऐकण्याची सोय उपलब्ध झाली आहे

Akshata Chhatre

नवी दिल्ली: गोव्यासह जगभरातील कोकणी भाषिक समुदायासाठी हा एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. आता लोकसभेचे संपूर्ण कामकाज कोकणी भाषेत थेट ऐकण्याची सोय उपलब्ध झाली असून यासाठी इव्हिटा डिसोझा, गौरी मावलिणकर आणि समीक्षा वेळीप यांची 'कोकणी दुभाषी' (Konkani Consultant Interpreters) म्हणून लोकसभा सचिवालयात नियुक्ती करण्यात आली आहे.

या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत या तिन्ही दुभाषींची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या नियुक्तीमुळे आता लोकसभेचे कामकाज स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कोकणी भाषेत अनुवादित होऊन थेट प्रसारित होणार आहे.

शरत कृष्णा रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही दुभाषींना प्रशिक्षण दिले गेले असून सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ पासून लोकसभेचे कामकाज पूर्णपणे कोकणी भाषेत थेट प्रसारित होण्यास सुरुवात होईल. यामुळे कोकणी भाषेला एक विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शरत रायकर, इव्हिटा डिसोझा, गौरी मावलिणकर आणि समीक्षा वेळीप यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT