Earthquake in Ladakh Dainik Gomantak
देश

Earthquake in Ladakh: लडाखमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 4.8 तीव्रता 

लडाखमध्ये आज सकाळी 4.19 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

लडाखमध्ये आज पहाटे 4.19 च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.8 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अल्ची (लेह) पासून 189 किमी उत्तरेस होता आणि त्याची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती. सध्या या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही.

याआधी 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12.50 च्या सुमारास मिझोराममधील चंफई येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी होती. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू चंफईच्या पूर्वेला पन्नास किलोमीटरवर होता आणि त्याची खोली जमिनीपासून 13 किलोमीटर खाली होती. 

मिझोरामपूर्वी 25-26 ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्रात (Maharashtra) भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी अफगाणिस्तानात पृथ्वीचा थरकाप झाल्याने लोक भयभीत झाले होते. त्यानंतर रात्री 2.21 मिनिटांनी कोल्हापुरात भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता 3.9 मोजली गेली. यानंतर जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "एका सेल्फीसाठी 100 रुपये लागतील!", वैभव सूर्यवंशीने मुलांकडे मागितले पैसे; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

VIDEO: "काँग्रेसमध्ये प्रवेश करणं हीच सर्वात मोठी रिस्क!" विद्यार्थिनीच्या उत्तरानं राहुल गांधी अवाक; संवादाचा व्हिडिओ व्हायरल

Crime News: "दोन मृतदेह अन् रक्तानं माखलेलं घर!" नराधम नवऱ्यानं बायको, सासूसह सासऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; संशयानं सुखी कुटुंबाची राखरांगोळी

Navpancham Drishti Yog 2026: "धाडसी निर्णय घ्या अन् मालामाल व्हा!" गुरु-वरुणचा नवपंचम दृष्टी योग, 'या' 5 राशींवर होणार धनाचा वर्षाव; घरात नांदणार सुख-समृद्धी

Iran US Tension: 'पाकिस्तान आमचा मित्र, पण निष्पक्ष नाही', इराणनं पाकड्यांना दाखवली जागा; मध्यस्थ म्हणून स्वीकारण्यास नकार

SCROLL FOR NEXT