Crime  Dainik Gomantak
देश

Kerala Crime: धक्कादायक! पेशंट म्हणून आलेल्या आरोपीने डॉक्टर महिलेची केली हत्या

Kerala: एका रुग्णाने 23 वर्षीय वंदना दासवर सर्जिकल कात्रीने हल्ला करुन तिची हत्या केली. कोट्टारक्करा तालुका रुग्णालयात ही घटना घडल्याची माहिती आहे.

Manish Jadhav

Kerala Crime: केरळमधील रुग्णालयात डॉक्टरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने डॉक्टरची हत्या केली तो दुसरा कोणी नसून त्याचा पेशंट होता. वंदना दास असे या डॉक्टरचे नाव आहे.

दरम्यान असे सांगितले जात आहे की, बुधवारी सकाळी एका रुग्णाने 23 वर्षीय वंदना दासवर सर्जिकल कात्रीने हल्ला केला, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. कोट्टारक्करा येथील रुग्णालयात ही घटना घडल्याची माहिती आहे.

दरम्यान, डॉ. दासवर हल्ला करणारा रुग्ण हा आरोपी (Accused) असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात आणले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे ड्रेसिंग करण्यासाठी पोलिसांनी त्याला रुग्णालयात आणले होते. उपचारादरम्यानच त्याने टेबलावर असलेल्या सर्जिकल कात्रीने डॉक्टरवर हल्ला केला.

आणखी 5 जणांवर हल्ला केला

यानंतर डॉ. वंदना दासला तिरुवनंतपुरम येथील रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉ. वंदना दास हाऊस सर्जन होती. डॉक्टर वंदना दासशिवाय आरोपीने आणखी पाच जणांवर हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला बेड्या न घालता रुग्णालयात आणले होते. आरोपी संदीप हा उच्च प्राथमिक शिक्षक असल्याचे सांगितले जाते, त्याला शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर ताब्यात घेण्यात आले होते.

दुसरीकडे, याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे समोर आले आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचे एडीजीपी अजित कुमार म्हणाले.

कुमार पुढे म्हणाले की, आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. जेव्हा डॉक्टर दास त्याला ड्रेसिंग करत होती, तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने पहिल्यांदा पोलीस हवालदारावर हल्ला केला.

तसेच, वंदना दास हिचा मृतदेह तिरुअनंतपुरमच्या KIMS रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनीही KIMS हॉस्पिटलमध्ये पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली.

दुसरीकडे, तिरुअनंतपुरममध्ये डॉक्टर वंदना दासच्या हत्येविरोधात हाऊस सर्जन असोसिएशन अंतर्गत वैद्यकीय विद्यार्थी आंदोलन करत आहेत. डॉक्टरांनी 24 तासांचा संप जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT