Kashmiri separatist Mirwaiz Umar Farooq 
देश

Mirwaiz Farooq: हुर्रियत नेते मीरवाइज यांची चार वर्षानंतर नजरकैदेतून सुटका, श्रीनगरमध्ये अदा केली नमाज

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी मीरवाइज उमर फारूख यांच्या सुटकेचे स्वागत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Kashmiri separatist Mirwaiz Umar Farooq: हुर्रियत नेते मीरवाइज उमर फारुक यांची सुटका करण्यात झाली आहे. मीरवाइजने शुक्रवारी श्रीनगरमधील जामिया मशिदीत नमाज अदा केली.

माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी मीरवाइज उमर फारूख यांच्या सुटकेचे स्वागत केले. मीरवाईज यांची नजरकैदेतून सुटकेचे मी स्वागत करतो, असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कारवाई करून हजारो राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तुरुंगात डांबले.

यानंतर श्रीनगरमधील सर्वात मोठे धार्मिक केंद्र जामिया मशीदही बंद करण्यात आली. फेब्रुवारी 2022 मध्ये पुन्हा ते प्रार्थनेसाठी उघडण्यात आले. मीरवाईज यांना या मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी नव्हती.

2019 पासून सरकारला काश्मिरी फुटीरतावाद्यांच्या तीव्र टीकेला सामोरे जावे लागत आहे. अलीकडेच, फुटीरतावादाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकलेल्या दोन मौलवींचीही सुटका करण्यात आली. काश्मीरमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.

मीरवाईज ऑगस्ट 2019 पासून नजरकैदेत होते

मीरवाइज हे जामिया मशिदीचे मुख्य मौलवी आणि काश्मिरी फुटीरतावादी गट असलेल्या हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत.

केंद्राने जेव्हा कलम 370 अंतर्गत जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केला, त्यावेळी 5 ऑगस्ट 2019 रोजी त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात मीरवाईज यांनी केंद्राशी चर्चा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT