Rakesh Tikait Dainik Gomantak
देश

Karnataka: शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेक; तीण जण ताब्यात

कर्नाटकमध्ये भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांच्या सुरक्षेबाबत मोठा निष्काळजीपणा असल्याचे दिसून आले आहे.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकमध्ये भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्या सुरक्षेबाबत मोठा निष्काळजीपणा असल्याचे दिसून आले आहे. बेंगळुरू येथील गांधी भवन येथे पत्रकार परिषदेदरम्यान एका व्यक्तीने टिकैत यांच्या अंगावर काळी शाई फेकली. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तिघांना अटकेत घेतले आहे. (Karnataka Ink thrown on farmer leader Rakesh Tikait Three in police custody)

शाई ओतल्याप्रकरणी बीकेयूचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, स्थानिक पोलिसांनी येथे मला कोणतीही सुरक्षा पुरवली नाही. हे सर्व सरकारच्या संगनमताने होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर वर्षभराहून अधिक काळ शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत हे आता एकटे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. एकंदरीत, देशातील मोठे शेतकरी नेते महेंद्रसिंह टिकैत यांच्या जयंतीनिमित्त भारतीय किसान युनियनमध्ये फूट पडली आहे. फुट पडण्यामागे राकेश टिकैत यांची बेताल वक्तव्ये आणि कृत्ये असल्याचे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: इंग्लंडला डबल झटका! आधी कांगारुंनी मैदानात दिली मात, नंतर WTC पॉइंट टेबलमध्ये झाली घसरण; जाणून घ्या भारताची सध्याची स्थिती

गोव्यात जमीनमालकांना झटका! मुंडकारांना हक्क मिळेपर्यंत जमिनीची विक्री होणार नाही; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

SCROLL FOR NEXT