Kabul Blast: India strongly condemns the bomb blasts in Kabul Dainik Gomantak
देश

Kabul Blast: भारताकडून तीव्र निषेध, दहशतवादाविरोधात जगाला एकत्र येण्याचे अवाहन

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीत गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन स्फोटांचा भारताने तीव्र निषेध केला आहे (Kabul Blast).

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीत गुरुवारी संध्याकाळी झालेल्या दोन स्फोटांचा भारताने तीव्र निषेध केला आहे (Kabul Blast). त्याच्या प्रतिसादात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की आम्ही काबूलमधील बॉम्बस्फोटांचा (Kabul Airport Blast) निषेध करतो. या दहशतवादी (Terrorist Attack) घटनेत ठार झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त करताना परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की, या हल्ल्यानंतर संपूर्ण जग दहशतवादाविरोधात आणि दहशतवाद्यांना (Terrorist) सुरक्षित आश्रय देणाऱ्यां विरोधात एकत्र येणे गरजेचे झाले आहे.(Kabul Blast: India strongly condemns the bomb blasts in Kabul)

काबुल मध्ये झालेल्या या बॉम्बस्फोटाची जिम्मेदारी इस्लामिक दहशतवादी संघटना (ISIS-K) ने घेतली आहे.

तालिबानने 15 ऑगस्ट 2021 रोजी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर भारताने या दहशतवादी संघटनेबद्दल पूर्ण जगातील साऱ्या सरकारांना अगदी स्पष्ट शब्दात इशारा दिला होता त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत अफगाणिस्तानात अस्थिरता पसरल्याने संपूर्ण जंगल आयएसचा धोका वाढला असल्याचे देखील सांगितले होते.

हल्ल्याबाबत आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता

बुधवारी संध्याकाळी काबूलमधील अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या अलर्टमध्ये नागरिकांना विमानतळाच्या दिशेने येण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला होता. जे आधीच विमानतळाच्या गेटवर उपस्थित आहेत त्यांनीही त्वरित निघून जावे. ऑस्ट्रेलियाने आपल्या लोकांना विमानतळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. याव्यतिरिक्त, यूकेचे सशस्त्र दलाचे मंत्री जेम्स हॅपी म्हणाले की, "मोठ्या हल्ल्याच्या अत्यंत विश्वासार्ह बातम्या आहेत". म्हणूनच लोकांनी विमानतळापासून दूर जावे.

या दहशतवादी हल्ल्यानंतर जो बायडन यांची उच्चस्तरीय बैठक

दरम्यान काबूलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची बातमी मिळाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायली पंतप्रधानांसोबतची नियोजित बैठक पुढे ढकलली आणि सुरक्षा टीमसोबत तातडीची बैठक घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT