Justice Lalit Dainik Gomantak
देश

Supreme Court: न्यायमूर्ती लळित यांनी CJI म्हणून सांगितल्या या प्राथमिकता

Supreme Court: न्यायमूर्ती लळित आता एनव्ही रमना यांच्यानंतर सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

दैनिक गोमन्तक

Justice Lalit: न्यायमूर्ती लळित आता एनव्ही रमना यांच्यानंतर सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती लळित शनिवारी पदभार स्वीकारणार आहेत. यातच शुक्रवारी त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आपल्या प्राधान्यांबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या 73 दिवसांच्या कार्यकाळात कोणत्या गोष्टींवर लक्ष देणार असल्याचे सांगितले.

दरम्यान न्यायमूर्ती लळित यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून ज्या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाईल त्याबद्दल सांगितले. ते म्हणाले की, न्यायालयातील खटल्यांची यादी सुलभ, स्पष्ट आणि पारदर्शक करणे यास प्राधान्य असेल.' याशिवाय विविध न्यायालयातील तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीला प्राधान्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. तिसरे प्राधान्य म्हणून वर्षभरात किमान एक घटनापीठ काम करेल, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असे ते म्हणाले.

तत्पूर्वी, शुक्रवारी निवृत्त सरन्यायाधीश एनव्ही रमणा (CJI NV Ramana) म्हणाले की, 'संविधान (Constitution) आणि कायदा सामान्य लोकांच्या परिचयाचा करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य आहे. तसेच, लोकांना न्यायव्यवस्थेबद्दल जागरुक करा आणि आत्मविश्वास निर्माण करा. ते पुढे म्हणाले की, 'आजही लाखो लोक दडपणाखाली जगत आहेत. या लोकांना वेळीच न्यायालयीन मदतीची गरज आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT