Jamia Millia Islamia Violence Case Dainik Gomantak
देश

Delhi Violence: जामिया हिंसाचार प्रकरणापासून 'या' न्यायमूर्तींनी घेतली फारकत, शरजील इमामसह 11 जणांची...

Delhi Court: 2019 च्या जामिया नगर हिंसाचार प्रकरणात विद्यार्थी कार्यकर्ते शरजील इमाम आणि आसिफ इक्बाल तान्हा यांच्यासह इतर नऊ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.

Manish Jadhav

Jamia Millia Islamia Violence Case: दिल्ली न्यायालयातील एका न्यायमूर्तींनी जामिया हिंसाचार प्रकरणापासून स्वतःला दूर केलं आहे. हे तेच न्यायमूर्ती आहेत, ज्यांनी अलीकडेच 2019 च्या जामिया नगर हिंसाचार प्रकरणात विद्यार्थी कार्यकर्ते शरजील इमाम आणि आसिफ इक्बाल तान्हा यांच्यासह इतर नऊ जणांची निर्दोष मुक्तता केली होती.

दरम्यान, त्यांनी "वैयक्तिक कारण" देत या प्रकरणाच्या सुनावणीपासून स्वतःला दूर केले. डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुल वर्मा सुनावणी करत होते.

"वैयक्तिक कारणांमुळे मी या प्रकरणाची सुनावणी घेण्यास टाळाटाळ करत आहे," असे न्यायमूर्तींनी शुक्रवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार, सध्याचे प्रकरण मुख्य जिल्हा आणि सत्र न्यायाधीश, दक्षिण पूर्व जिल्हा, साकेत न्यायालयासमोर 13 फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता प्रकरण हस्तांतरित करण्याची विनंती केली जाईल.

दुसरीकडे, पोलिसांनी (Police) आरोपींना बळीचा बकरा बनवल्याचे सांगत न्यायाधीशांनी 11 जणांना सोडण्याचे आदेश दिले होते. विरोध करणाऱ्यांचा आवाज दडपला जाऊ नये, अशी टिप्पणीही कनिष्ठ न्यायालयाने केली होती.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि पोलिसांच्या विरोधातील लोकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर डिसेंबर 2019 मध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या संदर्भात दिल्ली पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला होता. मीरान हैदर, आशु खान, कासिम उस्मानी, मोहम्मद हसन, मोहम्मद जमाल, मोहम्मद साहिल मुदस्सीर, फहीम हाश्मी, समीर अहमद, मोहम्मद उमर, मोहम्मद आदिल, रुहुल अमीर, चंदन कुमार आणि साकिब खान हे देखील सध्याच्या प्रकरणात आरोपी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT