BJP national pres JP Nadda in Hosapete,Karnataka ANI
देश

केंद्र सरकारने कर्नाटकातील 10 रेल्वे प्रकल्पांना दिली मंजुरी, जेपी नड्डा

इंदिरा आवास योजनेंतर्गत एका वर्षात 3-4 लाख घरे बांधण्यात आली आणि आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 कोटी 76 लाख घरे बांधण्यात आली आहेत.

दैनिक गोमन्तक

कर्नाटकातील होसापेट येथे राज्य कार्यकारिणींची बैठक पार पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी रविवारी सांगितले की, भारत सरकारने कर्नाटकातील (Karnataka) 10 रेल्वे प्रकल्पांना (Railway Project) मंजुरी दिली असून त्यांना आर्थिक मदत दिली आहे. लवकरच येथे 10 नवीन रेल्वे मार्ग सुरू होतील, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात 46.31 लाखांहून अधिक शौचालये बांधण्यात आली आहेत, असे कर्नाटकातील होसापेट येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जेपी नड्डा म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पुढे म्हणाले की, इंदिरा आवास योजनेंतर्गत एका वर्षात 3-4 लाख घरे बांधण्यात आली आणि आता प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 कोटी 76 लाख घरे बांधण्यात आली आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक शनिवारपासून विजयनगर जिल्ह्यातील होसपेट येथे सुरू झाली आहे, ज्यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा रविवारी उपस्थित होते. (BJP national pres JP Nadda in Hosapete,Karnataka)

दरम्यान कर्नाटक दौर्‍यादरम्यान, नड्डा यांनी राज्यातील विविध ऐतिहासिक मंदिरांना भेटी देताना पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली आहे. आज त्यांनी होसापाटे येथील भत्रहल्ली अंजनेय मंदिराला भेट दिल्यानंतर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करत होते. या दरम्यान त्यांनी प्रतिनिधींसोबत प्रश्नोत्तराच्या सत्रातही भाग घेतला.

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, नड्डा श्री विरुपक्षेश्वर मंदिर, हम्पीतील यंत्रोदारका अंजनेय मंदिर आणि कडाले कालू गणपा, सासुवे कालू गणपा, उगरा, नरसिंह, बदवी लिंग आणि उग्रणा वीरभद्र मंदिरासह अनेक मंदिरांना भेट देतील. त्याचबरोबर ते हंपी येथील मल्यवंता हिललाही भेट देणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: खेळपट्टी की मृत्यूचा सापळा? हेल्मेटला चेंडू लागताच फलंदाज जमिनीवर कोसळला अन् थेट रुग्णालयात पोहोचला; धोकादायक पीचमुळे सामना रद्द

Strait of Hormuz Ship Attack: "धमकावणं सोडा, आता थेट कृती!" इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचा होर्मुझमध्ये राडा; ओमानजवळ कंटेनर शिपवर अंदाधुंद फायरिंग

स्त्रियांवर होणारे अत्याचार कधी थांबणार? कुडचडेच्या घटनेने समाजाचा चेहरा विद्रूप; खापर फोडण्यात आपण 'माहीर', पण जबाबदारी कुणाची?

भळभळती आठवण- संपादकीय

24 एप्रिलपर्यंत खट्टरला अटक करा! सरदेसाईंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले, "मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसापूर्वी कारवाई न झाल्यास आंदोलन छेडणार!"

SCROLL FOR NEXT