India will soon get 'single dose' vaccine from johnson and johnson Dainik Gomantak
देश

भारताला लवकरच मिळणार 'सिंगल डोस' लस

johnson and johnson: कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सिंगल-डोस Covid19 Vaccine भारतात आणण्यासाठी आपली पुर्ण तयारी असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना लसीकरणाबाबत देशात आणखी एक सकारात्मक बाब समोर आली आहे. भारताला लवकरच पहिली एकच डोस असलेली कोरोना लस मिळू शकते. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने आपल्या सिंगल डोस कोरोना लसीच्या भारतामध्ये एमर्जीन्सी वापरासाठी अर्ज केला आहे. यावर लवकरच सरकारकडून निर्णय येऊ शकतो. परदेशी लसींच्या आयातीमुळे भारताच्या लसीकरण मोहिमेची गती वाढण्याची शक्यता आहे. (India will soon get single dose vaccine from johnson and johnson)

कंपनीने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, सिंगल-डोस कोरोना लस भारतात आणण्यासाठी आपली पुर्ण तयारी असल्याचे सांगितले आहे. भारत सरकारसोबत सुरू असलेल्या चर्चेमधुन आम्हाला अपेक्षा आहे. जॉन्सन अँड जॉन्सन इंडियाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, 5 ऑगस्ट 2021 रोजी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या सिंगल-डोस कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी भारत सरकारकडे मंजुरीसाठी अर्ज केला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या आपत्कालीन वापराची मंजुरी तिसऱ्या टप्प्यातील लसीच्या चाचणीच्या परिणामकारकता आणि सुरक्षा डेटावर आधारित आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या लसीचा सिंगल डोसचा अभ्यास केलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये गंभीर रोग रोखण्यासाठी आणि कोविड -19 शी संबंधित हॉस्पिटलायझेशन कमी करण्यासाठी ही लस 85 टक्के प्रभावी आहे. यासह, या लसीमुळे मृत्यूचे प्रमाण देखील कमी होते. लस घेतल्यानंतरच्या 28 दिवसांनी या लसीचे परिणाम दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT