Thief  Dainik Gomantak
देश

बिहारमध्ये दागिने चोर सक्रिय; दिवसाढवळ्या महिलांच्या दागिन्यांची लूट सुरू

महिलांचे दागिने लुटण्यासाठी ही टोळी अत्यंत अनोखी पद्धत वापरते.

दैनिक गोमन्तक

बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात दरोडेखोरांनी अनेक महिलांचे दागिने चोरले आहेत. हे दरोडेखोर महिलांना त्यांच्या बोलण्यात अडकवतात आणि दिवसाढवळ्या त्यांचे दागिने लुटून पळून जातात. भोजपूर जिल्ह्यातील आराह येथील दरोडेखोरांची टोळी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

महिलांचे (Women) दागिने लुटण्यासाठी ही टोळी अत्यंत अनोखी पद्धत वापरते. दागिने घालून घराबाहेर पडलेल्या महिलांवर या बदमाशांचे लक्ष असते. टोळीतील लोक अशा महिलांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना सांगतात की, जिल्ह्य़ातील पोलिस (Police) उपायुक्तांकडून दागिने घालणाऱ्या महिलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षणासाठी तुमचे दागिने काढून द्या. आम्ही माहिती लिहून घेतो आणि दागिने तुम्हाला परत करतो.

स्त्रिया त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि दागिने काढून देतात. दागिने हातात येताच चोर तिथून पळ काढतात. याबाबत अनेक महिलांनी पोलिसांना तक्रार केली आहे. महिलांच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. याबाबत बोलताना पोलिस अधिकारी म्हणाले, दागिने चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आम्ही याची चौकशी करत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

खरी कुजबुज: योग दिनावरून राजकारण करू नका!

खेळता-खेळता काळाने घातला घाला! मांगोरहिल येथे तीन वर्षीय बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT