Goa Crime News Dainik Gomantak
देश

Jammu Kashmir: शोपियानमध्ये पुन्हा काश्मिरी पंडिताची हत्या, सुरक्षा दलाचा परिसराला वेढा

दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडित बांधवांना गोळ्या घातल्या, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा नागरिकांवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी दोन काश्मिरी पंडित बांधवांना गोळ्या घातल्या, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मिरी पंडितांच्या गोळीबाराच्या वृत्तानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच दहशतवाद्यांविरोधात (Terrorists) कारवाई सुरू आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी छोटीगाम गावातील अर्जुननाथ कुमार यांचा मुलगा सुनील कुमार आणि पिंटू कुमार नावाच्या दोन काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit) भावांवर गोळीबार केला.

सुनील कुमारचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ जखमी झाला आहे. सध्या सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

11 ऑगस्ट रोजी बांदीपोरा येथे मजुराची हत्या झाली

याआधी 11 ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बिहारमधील एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केली होती. मृत मजूर मोहम्मद अमरेजच्या भावाने सांगितले की, तो मध्यरात्री घरातून बाहेर आला तेव्हा त्याला अमरेज रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. यानंतर अमरेजला हाजीन येथे आणण्यात आले तेथून त्याची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला रेफर केले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! DA मध्ये 3 ते 4% वाढीचे संकेत, अधिकृत घोषणा कधी होणार? मोठी अपडेट समोर

Goa Congress Crisis: गोव्यात काँग्रेसला पर्याय शोधत विरोधकांची तिसरी आघाडी तयार? BJP विरोधात नवे प्रादेशिक पक्ष सज्ज

Brock Lesnar Retirement: 10 वेळचा WWE वर्ल्ड चॅम्पियन ब्रॉक लेसनर निवृत्त; म्हणाला, 'योग्य वेळी थांबण्याचा निर्णय...'

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT