Jammu Kashmir Twitter
देश

Jammu Kashmir: सुरनकोटमधील लष्करी छावणीत सैनिकाने केला गोळीबार, 2 जवान शहीद

एका सैनिकाने त्याच्या बॅरेकमधील इतर 3 जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आणि नंतर स्वत:च्याच शस्त्राने पोटात गोळी झाडून घेतली.

दैनिक गोमन्तक

Jammu Kashmir Soldier Killed: जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट येथे लष्कराच्या छावणीत गोळीबार झाला आहे. यामध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजता एका सैनिकाने त्याच्या बॅरेकमधील इतर 3 जवानांवर गोळीबार केल्याची घटना घडली आणि नंतर स्वत:च्याच शस्त्राने पोटात गोळी झाडून घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी पूंछमधील सुरनकोट येथील 156 टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये घडली. कालाकोट येथील रहिवासी इम्रान अहमद आणि मेंढर येथील इम्तियाज अहमद यांच्यात काही वैयक्तिक कारणावरून जोरदार वाद झाला आणि त्यांनी गोळीबार केला.

दोन जवान शहीद, दोन जखमी

माखन सिंग आणि खलील अहमद नावाच्या इतर सैनिकांनाही गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. जखमींना उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत २ जवानांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.

यापूर्वीही अशी घटना घडली आहे

अशीच एक घटना छत्तीसगडच्या सुकमा येथे नोव्हेंबर 2021मध्ये घडली होती जेव्हा एका जवानाने त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला होता. यामध्ये सीआरपीएफच्या चार जवानांना प्राण गमवावे लागले तर तीन जखमी झाले होते. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील निमलष्करी दलाच्या तळावर जवानाने गोळीबार केला होता. राज्याची राजधानी रायपूरपासून सुमारे 400 किमी अंतरावर जिल्ह्यातील लिंगमपल्ली गावात सीआरपीएफच्या 50 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये पहाटे 3.45 वाजता ही घटना घडली. अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, जवानाने त्याच्या सर्व्हिस वेपन एके-47 रायफलने त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 13 September 2026: बुध-चंद्राचा महासंग्राम! आज 'या' 3 राशींवर ओढवणार मोठे संकट? पैशांचे व्यवहार करताना सावध राहा

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

SCROLL FOR NEXT