Jammu And Kashmir  Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir मध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, सुरक्षा दलांनी जप्त केली स्फोटके

Raid in Kathua: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील कठुआ परिसरातून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलांनी 3 IED आणि 3 स्टिक बॉम्ब जप्त केले आहेत. सुरक्षा दलांनी जैशचा दहशतवादी झाकीर हुसेन भट याला अटक केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर त्या भागात छापा टाकला, जिथे हे स्फोटक जप्त करण्यात आली. सुरक्षा दलांकडून अजूनही परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

जैशचा दहशतवादी झाकीरच्या चौकशीनंतर छापेमारी

या प्रकरणाची माहिती देताना एडीजीपी जम्मू मुकेश सिंह (ADGP Jammu Mukesh Singh) यांनी सांगितले की, 'सुरक्षा दलाने ही कारवाई जैशचा दहशतवादी (Terrorist) झाकीर हुसैन भट्टच्या चौकशीनंतर केली आहे.' उधमपूर स्फोटानंतर सतर्क झालेल्या जिल्हा पोलिसांनी मालाड, बिल्लावरचा रहिवासी झाकीर याला पकडले होते.

याशिवाय, पोलिसांनी (Police) कठुआ परिसरात सीमेजवळ संशयास्पद फुगा जप्त केला आहे. या फुग्यावर पाकिस्तानच्या (Pakistan) समर्थनाचा नारा लिहिण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फुग्यावर 'आय लव्ह पाकिस्तान' असे लिहिले होते. पोलिसांनी हा फुगा ताब्यात घेतला आहे. सध्या सुरक्षा यंत्रणा या फुग्याच्या तपासात गुंतल्या आहेत.

कोण आहे दहशतवादी झाकीर?

झाकीर सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या मदतीने पाकिस्तानमध्ये बसलेल्या जैशच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्याच्याकडून आयईडी जप्त करण्यात आला आहे. तो खोऱ्यात मोठ्या हल्ल्याची योजना आखत होता, असे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही एका प्रकरणात तो दोषी आढळला होता. विशेष म्हणजे, तो 14 वर्षे कोट भालवाल कारागृहात होता. मात्र 2019 मध्ये त्याची सुटका झाली होती. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो पुन्हा दहशतवादी गटामध्ये सामील झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT