Jammu & Kashmir police arrested four terrorists of Jaish-e-Mohammed Dainik Gomantak
देश

पुलवामा हल्ल्याची पुनरावृत्ती टळली, स्वातंत्रदिनी रचलेला हल्ल्याचा कट उधळला

जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या मोठ्या दहशतवादी(Terrorists) संघटनेच्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) पोलिसांनी जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या मोठ्या दहशतवादी (Terrorists) संघटनेच्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे.या त्यांनी रचलेल्या हल्ल्याच्या योजनेत 15 ऑगस्ट (Independence Day) रोजी पुलवामा हल्ल्याची (Pulwama Attack)पुनरावृत्तीचे स्वरूप अर्थात कारसह आयईडी स्फोट तयार करण्यात आला होता. पोलिसांना (Jammu Kashmir Police) याची वेळीच माहिती मिळाली आणि विशेष कारवाईदरम्यान जैश-ए-मोहम्मद संघटनेवर अटकेची कारवाई करण्यात आलली आणि या योजनेत सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.(Jammu-Kashmir police arrested four terrorists)

लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी आधीच पोलिस आणि लष्कराला दिली आहे. ही माहिती मिळाल्यापासून जम्मू -काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कट उधळून लावण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जम्मू -काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील भागात गस्त वाढवण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, जम्मू पोलिसांनी आपली माहिती प्रणाली देखील सक्रिय केली आहे. याच माहितीच्या आधारे जम्मू पोलिसांनी विशेष कारवाई करत जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांना अटक केली आहे . हे दहशतवादी 15 ऑगस्ट रोजी पुलवामा हल्ल्याच्या धर्तीवर जम्मूमध्ये आयईडी स्फोटाची योजना आखत होते.

याची पुष्टी करत आयजीपी मुकेश सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की मोठा हल्ला टळला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. हे दहशतवादी जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होते. काश्मीर खोऱ्यात कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून ड्रोनच्या मदतीने सीमेपलीकडून फेकले जाणारे शस्त्र आणि दारूगोळा पोहचवण्याचे काम अटक केलेल्या दहशतवाद्यांवर सोपवण्यात आले होते.

15 ऑगस्ट रोजी आयईडीसह कार स्फोट करण्याची योजनाही तयार केली आहे. फक्त शस्त्रे आणि IED ची वाट पाहत आहे. ज्या ठिकाणी हे स्फोट होणार होते त्याबद्दल पोलीस दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT