Shopian Dainik Gomantak
देश

Terrorist Attack In Shopian: शोपियानमध्ये आणखी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या

Terrorist Attack In Shopian: जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांवर होणारे दहशतवादी हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून काश्मिरी पंडितांवर आणि देशाच्या इतर भागातून रोजगाराच्या शोधात काश्मीर खोऱ्यात पोहोचलेल्या लोकांवर सातत्याने दहशतवादी (Terrorist) हल्ले होत आहेत, ज्यामध्ये काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा खोऱ्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये (Shopian) दहशतवाद्यांनी पुरण कृष्ण भट नावाच्या व्यक्तीला गोळ्या घातल्या. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात (Hospital) नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मिरी पंडित निशाण्यावर

काश्मीरमध्ये काश्मिरी पंडित आणि स्थलांतरित मजुरांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. 16 ऑगस्ट रोजी शोपियानमध्ये आणखी एक काश्मिरी पंडित सुनील कुमार भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती, तर त्यांचा भाऊ पिंटू या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. या घटनेत दोघेही भाऊ शोपियानमधील छोटेपोरा भागात त्यांच्या सफरचंदाच्या बागेत काम करत होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी दोघांवर हल्ला केला. या घटनेपूर्वी या वर्षी अनेक स्थलांतरित मजुरांनाही दहशतवाद्यांनी आपले बळी बनवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court: स्वतःच्या इच्छेनं देहव्यापार करणं गुन्हा नाही! वेश्याव्यवसायावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; काय नेमकं प्रकरण?

Goa land Zoning: 17 गावांतील सुमारे 2.01 कोटी चौरस मीटर जमीन 'NDZ'मध्‍ये; सूचना, हरकतींसाठी 30 दिवसांची मुदत; टीसीपीचा निर्णय

IPL 2026: कॅप्टन रजत पाटीदारचा मास्टरस्ट्रोक; आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकले आयपीएलचे जेतेपद!

Goa Comunidade land: जमीन घोटाळा प्रकरणी सावंत गावकर आक्रमक; सर्वण कोमुनिदादची जमीन, गावकऱ्यांनी अखेर उभारला फलक

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT