Indian Army Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: ग्रेनेड स्फोटात लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू, अनेक सैनिक जखमी

Indian Army: जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट झाला.

दैनिक गोमन्तक

Jammu And Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या मेंढर सेक्टरमध्ये ग्रेनेडचा स्फोट झाला. या स्फोटात भारतीय लष्कराचा एक कॅप्टन आणि एका जेसीओचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर स्फोटामुळे अनेक जवान जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ड्युटीवर असताना ग्रेनेडचा स्फोट झाला

जम्मू-आधारित संरक्षण मंत्रालयाचे प्रादेशिक प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांच्या म्हणण्यानुसार, 17-18 जुलैच्या रात्री, भारतीय सैनिक जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये कर्तव्य बजावत होते. यादरम्यान अचानक ग्रेनेडचा स्फोट झाला, त्यात अधिकारी आणि अनेक जवान जखमी झाले. या स्फोटात जखमी झालेल्या अधिकारी आणि जवानांना हेलिकॉप्टरने उधमपूर येथील कमांड हॉस्पिटलमध्ये (Hospital) दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिथे कॅप्टन आनंद आणि नायब सुभेदार भगवान सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रेनेड स्फोटाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही

हा ग्रेनेड स्फोट कसा झाला याबाबत लष्कराने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याची माहिती मिळताच कॅप्टन आनंद आणि नायब सुभेदार भगवान सिंह हे सहकारी जवानांसोबत ‘अम्बुश’ करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी ग्रेनेडचा स्फोट झाला. आनंद हा मूळचा बिहारमधील (Bihar) भागलपूर जिल्ह्यातील, तर नायब सुभेदार भगवान सिंग हे उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगरचे रहिवासी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Self Discovery Through Writing: लेखन, कीर्तन आणि भजन; समाजप्रबोधनाची आणि आत्मशोधाची उज्वल परंपरा

Viral Video: 'तिकीट कन्फर्म होतं बहुतेक!' रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांऐवजी म्हशींचा वावर, डब्यात बकऱ्यांचा मुक्काम; व्हिडिओ झाला व्हायरल

Marathi Konkani Language Debate: मराठी आणि कोंकणीच्या संघर्षातून भाजपचा राजकीय उदय

PM Kisan Scheme Update: 'पीएम किसान योजना' बंद होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केला पुढील पाच वर्षांचा रोडमॅप

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT