jammu and kashmir vaishno devi pilgrims catches fire near katra of jammu kashmir  Danik Gomantak
देश

वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला लागली आग, होरपळून चौघांचा मृत्यू

वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला आग 22 जण जखमी

दैनिक गोमन्तक

वैष्णोदेवीला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बसला आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी आहेत. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील कटराजवळ वैष्णोदेवी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला शुक्रवारी आग लागून किमान चार जणांचा मृत्यू झाला. तर 22 जण जखमी झाले आहेत. (vaishno devi pilgrims catches fire near katra of jammu kashmir)

वृत्तानुसार, कटरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नोमाईजवळ बसमधून मोठ्या संख्येने यात्रेकरू जम्मूला जात होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कटरा हे प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी बेस कॅम्प आहे. जम्मू विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) मुकेश सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, प्राथमिक तपासात स्फोटकांचा वापर झाल्याचे समोर आले नसले तरी फॉरेन्सिक टीम आगीचे कारण तपासत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

Amthane Dam Overflow: 'आमठाणे' धरण ओव्हरफ्लोच्या उंबरठ्यावर! 52 मीटरची क्षमता; सध्या 50 मीटर पाणीसाठा

SCROLL FOR NEXT