Terrorist Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: लष्कर-ए-तैय्यबाचे दोन दहशतवादी पोलिसांच्या ताब्यातून पळाले, राज्यात अलर्ट जारी

Lashkar-e-Taiba: जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन दहशतवादी पोलिसांच्या ताब्यातून पळाले आहेत.

Manish Jadhav

Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. दोन दहशतवादी पोलिसांच्या ताब्यातून पळाले आहेत. हे दोन्ही फरार दहशतवादी लष्कर-ए-तैय्यब या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधून हे दहशतवादी पसार झाले आहेत.

पोलिसांनी (Police) सांगितले की, या दहशतवाद्यांना बारामुल्ला पोलीस ठाण्यात आणले जात होते. मात्र, वाटेतच त्यांनी पोलिसांना चकमा देऊन पळ काढला. त्यानंतर आता, पोलिसांनी राज्यात अलर्ट जारी केला आहे.

दोन्ही दहशतवादी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी बारामुल्ला येथील पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले आहेत. पोलिसांनी राज्यभर अलर्ट जारी केला आहे. दोन्ही दहशतवाद्यांचा (Terrorist) पोलीस कसून शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैय्यबच्या या दहशतवाद्यांना आज जिल्हा कारागृह बारामुल्ला येथून बारामुल्ला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले जात होते. मात्र, वाटेतच ते फरार झाले. संपूर्ण खोऱ्यात पोलीस आणि प्रशासन दोघेही सतर्क आहेत.

दोघेही लष्कर-ए-तैय्यब या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते

दोन्ही फरार दहशतवाद्यांची ओळख लष्कर-ए-तैय्यब या दहशतवादी संघटनेचे मारुफ नजीर आणि शाहिद शौकत अशी झाली आहे.

विशेष म्हणजे, हे दोन्ही दहशतवादी बारामुल्ला येथील दारुच्या दुकानावर झालेल्या हल्ल्यात सहभागी होते. त्यावेळी, या दोन्ही दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली होती.

हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैय्यबसाठी काम करत असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली. या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT