All Eyes on Reasi Dainik Gomantak
देश

सोशल मीडियावर ‘All Eyes on Reasi’ होतेय ट्रेंड; आतापर्यंत 5.5 लाखांहून अधिक लोकांनी पोस्ट केली स्टोरी

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘All Eyes On Reasi’ हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

Manish Jadhav

All Eyes On Reasi Trend On X: जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे रविवारी संध्याकाळी यात्रेकरुंच्या बसवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. हे यात्रेकरु रियासी जिल्ह्यातील प्रसिद्ध शिव मंदिर शिवखोडी येथून दर्शन घेऊन परत होते. याचदरम्यान दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्याने बस खोल दरीत कोसळली. या हल्ल्यात दोन-तीन पाकिस्तानी दहशतवादी सहभागी असल्याचे समजतेय. यावर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर दहशतवादी राजौरी, रियासी आणि पूंछमध्ये लपले आहेत. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे समजल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. काल देश नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याचा आनंद साजरा करत होता. याचदरम्यान, दहशतवाद्यांनी निरपराध लोकांना लक्ष्य केले.

जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ‘All Eyes On Reasi’ हॅशटॅग ट्रेंड करत आहे. यावर 5.5 लाखांहून अधिक लोकांनी स्टोरी पोस्ट केल्या आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी एल्विस यादव याचाही समावेश आहे. सोशल मीडियावर #All Eyes On Reasi पोस्ट करुन देशभरातील अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

दुसरीकडे, ज्या प्रत्यक्षदर्शींनी हा हल्ला पाहिला त्यांनी सांगितले की बस दरीत कोसळल्यानंतरही दहशतवाद्यांनी अनेक मिनिटे गोळीबार सुरुच ठेवला. याशिवाय, एका वाचलेल्या व्यक्तीने बस खोल दरीत कोसळण्यापूर्वी दहशतवाद्यांनी 25-30 गोळ्या झाडल्याचे सांगितले. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी दहा यात्रेकरुंच्या मृत्यूची पुष्टी केली.

दरम्यान, प्राथमिक अहवालात दहशतवाद्यांनी यांत्रेकरुंच्या बसला लक्ष्य केल्याचे समोर आले. अंदाधुंद फायरिंगमुळे ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे बस दरीत कोसळली. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. शिव खोरी मंदिराभोवतालची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचाही आढावा घेतला. जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी माहिती दिली की, पंतप्रधानांनी त्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आणि पीडित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तिसऱ्या अपत्याला 30 हजार तर चौथ्याला 40 हजार, आंध्र प्रदेश सरकारची अनोखी स्कीम; मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा VIDEO

Rahu Gochar: नक्षत्र बदलून राहू करणार 3 राशींना मालामाल; मनासारखी नवीन नोकरी आणि मोठ्या पॅकेजची मिळणार ऑफर

Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

Goa Dairy Subsidy: दूध उत्पादक आक्रमक! मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरू; उत्तर गोवा शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा

Middle East War: एलपीजी, पेट्रोल अन् डिझेल आणखी महाग होणार? ट्रम्प-नेतान्याहूकडून मोठ्या हल्ल्याची तयारी; 'टार्गेट लिस्ट' बनवली

SCROLL FOR NEXT