3 Terrorist killed in Jammu Kashmir Dainik Gomantak
देश

जैश-ए-मोहोम्मदच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा; सर्च ऑपरेशन सुरुच

Jammu Kashmir Encounter: दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अजूनही या परिसरात शोधमोहीम सुरू असून, मागच्या दोन दिवसांत घडलेली ही चकमकीची ही दुसरी घटना आहे.

दैनिक गोमन्तक

जम्मू -काश्मीरच्या (Jammu- Kashmir) पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या असताना आज अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. नागबेरन त्रालच्या जंगलाच्या वरच्या भागात शनिवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये मोठी चकमक झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, मारले गेलेले सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.

जम्मू -काश्मीर पोलिसांनी ट्वीट करत, बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित 3 अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी अजूनही या परिसरात शोधमोहीम सुरू असून, मागच्या दोन दिवसांत घडलेली ही चकमकीची ही दुसरी घटना आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन हंगलमार्गचा एक भाग म्हणून व्हिक्टर फोर्स 17 ऑगस्ट 2021 पासून नागबेरन आणि दचिगाम जंगलांच्या वरच्या भागात शोध मोहीम राबवत आहे. या दरम्यान, शनिवारी ऑगस्ट रोजी सकाळी 6:45 वाजता दहशतवाद्यांशी सुरक्षा जवानांची चकमक झाली आणि ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दोन AK-47, एक SLR आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेले दहशतवादी हे जैश-ए-मोहोम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधीत होते, तरी त्यांची ओळख पटलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT