Masood Azhar Dainik Gomantak
देश

NIA चा मोठा खुलासा, PM मोदींच्या काश्मीर दौऱ्यात मसूद अझहरने रचला होता कट

Masood Azhar to target PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यादरम्यान हल्ल्याची योजना आखली होती.

दैनिक गोमन्तक

PM Modi Kashmir Visit: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याने एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्यादरम्यान हल्ल्याची योजना आखली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ( NIA) तपासात ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी एनआयए आज (19 ऑक्टोबर) विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहे.

सुंजवानमध्ये 2 दहशतवादी मारले गेले

24 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. पीए मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी 22 एप्रिल रोजी सुंजवान मिलिटरी स्टेशनजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-E-Mohammed) 2 दहशतवादी मारले गेले. या चकमकीत 1 जवान शहीद तर 4 जण जखमी झाले होते.

पंतप्रधान मोदींनी काश्मीरला दिली मोठी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) सांबा जिल्ह्यातील पल्ली ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले होते. यादरम्यान ते राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. यादरम्यान पीएम मोदींनी सुमारे 20 हजार कोटींच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT