Its important to talk to people if the system fails
Its important to talk to people if the system fails 
देश

‘’व्यवस्था फेल, जन की बात करणं महत्त्वाचं’’

गोमंतक वृत्तसेवा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज लाखांच्या घरात नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. दरम्यान पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासींयाशी संवाद साधला. एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारं कोरोनाविरुद्धचा लढा निकराने लढत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तर दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.  (Its important to talk to people if the system fails)

‘’व्यवस्था फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणं महत्त्वाचं आहे. कोरोना संकटामध्ये देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विनंती आहे की, राजकिय कामं सोडून सर्वांनी केवळ लोकांना मदत करा, सर्व प्रकारचं देशवासियाचं दु:ख दूर करा. आणि कॉंग्रेस परिवाराचा हाच केवळ धर्म आहे,’’ असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

या आगोदर, ‘’केंद्र सरकारला सदभावनेनं विनंती आहे की, पीआर आणि अनावश्यक प्रोजेक्टरवर खर्च करण्यापेक्षा लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या काळात कोरोनाचं संकट अधिक भयानक रुप धारण करणार आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशाला तयार केलं पाहिजे. सध्याची  दुर्दशा सहन न होणारी आहे,’’  असं म्हणत राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे.

तसेच ‘’वाढत्या कोरोनाच्या संसर्गमुळे ऑक्सिजनचा स्तर घसरु लागला आहे. मात्र सततच्या ऑक्सिजन,आयसीएयू बेडच्या कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहेत. मोदी सरकार ही जाबबदारी तुमची आहे,’’ असं देखील राहुल गांधी केंद्र सरकारला उद्देशून म्हणाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT