IRCTC Goa Tour Package Dainik Gomantak
देश

Goa Tour Package: महिलांना IRCTC कडून मोठी भेट; कमी पैशात करा गोव्याची सैर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

IRCTC चे हे विशेष पॅकेज मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी आहे.

Pramod Yadav

घरकाम आणि ऑफिसच्या कामातून मोकळीक मिळावी यासाठी लोक सुट्टी एन्जॉय करायला जात असतात. सुट्या तुम्हाला रिफ्रेश करतात. घर आणि ऑफिस सांभाळण्यात महिला खूप व्यस्त असतात त्यामुळे महिलांना स्वतःकडे लक्ष द्यायाला वेळ मिळत नाही. त्यामुळे महिलांसाठी सुट्टी खूप महत्त्वाची असते.

दरम्यान, यावर्षी महिला दिनानिमित्त IRCTC ने महिलांसाठी मोठी भेट दिली असून, कमी पैशात गोव्याची सैर करता येणार आहे. (IRCTC Goa Tour Package For Women's Day 2023)

दरवर्षी 08 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या खास प्रसंगी IRCTC ने महिलांना कमी पैशात गोव्यात जाण्याची संधी दिली आहे. महिला दिन स्पेशल गोवा डिलाइट एक्स भुवनेश्वर नावाचे हे टूर पॅकेज 07 मार्चपासून सुरू होणार आहे.

या पॅकेजअंतर्गत तुम्हाला गोव्यात चार रात्री आणि पाच दिवस राहण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये गोव्यातील सुंदर समुद्रकिनारा, तेथील संस्कृती आणि मनमोहक निसर्गाचा आनंद घेता येणार आहे.

IRCTC चे हे विशेष पॅकेज मार्च आणि एप्रिल महिन्यासाठी आहे. यामध्ये फ्लाइटचे भाडे, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, एसी बसचा समावेश आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील प्रेक्षणीय स्थळांव्यतिरिक्त, यात क्रूझ राईड आणि गाला डिनरचा समावेश असेल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

या टूर पॅकेज अंतर्गत प्रवास करायचा असेल तर 07 मार्चपासून बुकिंग करावे लागेल. यानंतर, तुम्हाला गोव्याला जाण्यासाठी भुवनेश्वरहून गोव्याला जाणारे विमान गाठावे लागेल. गोव्यात 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळेल.

या टूर अंतर्गत, तुम्हाला सुंदर समुद्रकिनारे, लेणी आणि धबधबे, रेइस मागोस किल्ला इत्यादी पाहता येईल. याशिवाय महिलांना क्रूझ आणि गाला डिनरचा आनंदही घेता येईल.

गोवा टूरसाठी तुम्हाला खूप कमी खर्च असेल. या संपूर्ण टूर पॅकेजसाठी दोन व्यक्तींना 25,745 रुपये आणि तीन व्यक्तींना 24,615 रुपये मोजावे लागणार आहेत.

यामध्ये भुवनेश्वर ते गोव्याचे विमान तिकीट, चार रात्री गोव्यात हॉटेलमध्ये राहणे, चार वेळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण, मांडवी नदीवरील क्रूझ तिकीट, गाईडची व्यवस्था या सुविधा उपलब्ध असतील. या टूर पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT