Iqbal Singh Lalpura Dainik Gomantak
देश

BJP Parliamentary Board: भाजपच्या संसदीय मंडळात पहिल्यांदाच मिळाले शीख नेत्याला स्थान

Iqbal Singh Lalpura: भारतीय जनता पक्षाने (BJP) बुधवारी आपल्या संसदीय मंडळात मोठा बदल करुन प्रथमच शीख नेत्याला स्थान दिले.

दैनिक गोमन्तक

BJP Parliamentary Board: भारतीय जनता पक्षाने (BJP) बुधवारी आपल्या संसदीय मंडळात मोठा बदल करुन प्रथमच शीख नेत्याला स्थान दिले आहे. पक्षाकडून संसदीय मंडळात समाविष्ट करण्यात आलेल्या अकरा सदस्यांमध्ये इक्बाल सिंग लालपुरा यांच्या नावाचा समावेश आहे. इक्बाल सिंग लालपुरा हे पंजाबचे प्रसिद्ध नाव आहे. तसेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर लालपुरा यांनी 2012 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. लालपुरा यांचा संसदीय मंडळात समावेश करण्यामागे अनेक राजकीय समीकरणे आहेत.

दरम्यान, संसदीय मंडळात लालपुरा यांची नियुक्ती अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लालपुरा यांचा संसदीय मंडळात समावेश करण्याला पंजाबमध्ये (Punjab) राजकीय महत्त्व आहे. पंजाबमध्ये भाजपला (BJP) शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत भाजपचे लक्षही पंजाबकडे आहे. लालपुरा हे पंजाबमधील दुसरे नेते आहेत, जे उच्च पदावर निवडून आले आहेत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीकडे भाजपचे लक्ष

यापूर्वी माजी राज्यमंत्री विजय सांपला यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते. पंजाबमधील शेतकऱ्यांची (Farmers) नाराजी विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आली. जिथे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासोबत भाजप रिंगणात होता, तरीही सत्तेपर्यंत पोहोचू शकला नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला पंजाबमध्ये आपले स्थान मजबूत करायचे आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, इक्बाल सिंग लालपुरा यांचा संसदीय मंडळात समावेश करणे हे भाजपचे आणखी एक मोठे पाऊल आहे.

पंजाबच्या रोपर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लालपुरा यांनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान पंजाबच्या अनेक भागांना वारंवार भेटी दिल्या होत्या. यादरम्यान त्यांना संगरुर आणि बर्नाळा येथेही विरोधाला सामोरे जावे लागले होते. माजी आयपीएस असल्याने लालपुरा यांची पंजाबमध्ये चांगली प्रतिमा आहे. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांना अटक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीन सदस्यांच्या गटाचा लालपुरा देखील एक भाग होते.

पोलीस सेवेत असताना सीआयडीचे अतिरिक्त महानिरीक्षकही होते

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी लालपुरा हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लालपुरा यांनी पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. यापैकी त्यांनी अमृतसरचे एसएसपी, तरनतारनचे एसएसपी आणि अमृतसरमध्ये सीईआयडीचे अतिरिक्त महानिरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT